Marathi Serial SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Serial : 'लय आवडतेस तू मला' मालिकेत नवीन वळण, सानिका अन् सरकारच्या नात्यात आला मोठा अडथळा

Lai Avadtes Tu Mala Serial Update : लोकप्रिय मालिका 'लय आवडतेस तू मला' मध्ये आता नवीन वळण पाहायला मिळणार आहे. सानिका आणि सरकारच्या नात्यात पुन्हा अडथळा येणार आहे. मालिकेत नेमकं काय घडणार जाणून घ्या.

Shreya Maskar

'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala ) या मालिकेतील सरकार-सानिकाला प्रेक्षक भरभरून प्रेम देतं आहेत. प्रत्येक दिवशी मालिका अधिकाधिक रंजक होतं आहे. सरकार - सानिकाच्या प्रेम कहाणीच्या प्रवासात सतत अडथळे येत आहेत. पहिल्या पासूनच सर्वेश सानिका आणि सरकारमध्ये दुरावा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतानाच आता मालिकेत पुन्हा एकदा सईची एन्ट्री होणार आहे.

सईच्या येण्यामुळे सानिका आणि सरकारच्या नात्यात काय वळण येईल आणि त्यांना कोणत्या नवी संकटांना समोरे जावे लागणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. सरकार-सानिकाच्या नात्यात आलेली जवळीक प्रेक्षकांच्या मनाला भिडत असतानाच कथानकात आता अनेक रोमांचक वळण येणार आहे. सानिका सरकारचा वाढदिवस खास बनवण्यासाठी सरप्राईज तयारी करत आहे. पण त्याच वेळी सईही सरकारसाठी खास काहीतरी घेऊन आली आहे.

सईने सरकारला सांगितलंय की, "ती फक्त त्याच्या वाढदिवसासाठीच इथे आली आहे आणि त्याच्या आयुष्यातून सहजा सहजी जाणार नाही." सरकारचा वाढदिवस साजरा होत असताना सई, सानिका, आणि सरकार यांच्यातील तणाव थोडा वाढताना दिसणार आहे. इतकं सगळं होत असताना सानिका सरकारचा वाढदिवस खूप सुंदररित्या साजरा करते.

सानिका आणि सरकारचे नाते सईसमोर आल्यावर पुढे काय होईल? हे 'लय आवडतेस तू मला' या मालिकेच्या पुढच्या भागात पाहायला मिळेल. ही मालिका कलर्स मराठीवर रात्री 9.30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भात तापमान ४५ पेक्षा जास्त

IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

SCROLL FOR NEXT