Aai Kuthe Ky Karte Serial  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Madhurani Prabhulkar: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरांची ऑनलाईन फसवणूक

'आई कुठे काय करते' या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि त्यांचे पती प्रमोद प्रभुलकर यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Madhurani Prabhulkar: 'आई कुठे काय करते' या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि त्यांचे पती प्रमोद प्रभुलकर यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गणपतीपुळे येथे फिरायला जाण्याकरिता त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हॉटेल बूक केले होते. पण त्यांची त्या ठिकाणी फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. ऑनलाईन पद्धतीने त्यांना 17 हजाराचा गंडा घालण्यात आला होता.

गणपतीपुळ्यात त्यांनी दोन दिवसांच्या हॉटेल बुकिंगसाठी १७ हजार इतकी रक्कम भरली होती, पण त्या ठिकाणी गेल्यावर काही वेगळेच प्रकरण समोर आले. त्या हॉटेलवर त्यांच्या नावाने कोणतीच बुकिंग न झाल्याचं त्यांना समजलं. प्रमोद प्रभुलकर यांनी तिथल्या मॅनेजमेंटला याबाबत चौकशी केली असता मॅनेजमेंटकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळाली होती, असा आरोपच प्रमोद प्रभुलकर यांनी केला.

संबंधित रिसॉर्ट शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रवींद्र फाटक यांचे असल्याचे मॅनेजमेंटने सांगितले. 4 स्टार असलेल्या हॉटेलमध्ये फसवणूक झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

परंतु ही फसवणूक हॉटेलकडून झालेली नसल्याचेही यावेळी स्पष्ट झालेय. उत्तर भारतीय व्यक्तींकडून हॉटेलची साईट हॅक केल्याचे यावेळी उघडकीस आले. प्रभूलकर यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचे एक लाख साठ हजारांची फसवणूक झाल्याचाही व्हिडओ माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT