Sara Ali Khan Vicky Kaushal: 'द इमॉर्टल अश्वत्थामा' चित्रपटातून सारा अली खान बाहेर, 'हे' आले कारण समोर

कथा बदलली तेव्हा अभिनेत्रीची भूमिका देखील बदलली. त्यामुळे सारा अली खानला चित्रपटातून बाहेर पडावे लागत आहे.
Sara Ali Khan Replaced In Upcoming Bollywood Movie
Sara Ali Khan Replaced In Upcoming Bollywood MovieInstagram@SaraAliKhan

Sara Ali Khan Vicky Kaushal: अभिनेत्री सारा अली खान आणि विकी कौशल यांचा 'द इमॉर्टल अश्वत्थामा' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, काही काळ या चित्रपटाबाबत कोणतीही बातमी समोर आली नव्हती. अशातच चित्रपट पुन्हा फ्लोरवर येण्यासाठी सज्ज असल्याच्या बातम्या येत आहेत, परंतु यावेळी या चित्रपटात बरेच बदल करण्यात आले आहेत. त्यातील एक बदल म्हणजे अभिनेत्री सारा अली खान आता या चित्रपटात विकी कौशलसोबत दिसणार नाही.

एक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाची मुख्य अभिनेत्री सारा अली खानला रिप्लेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्मात्याचे म्हणणे आहे की, या चित्रपटात विकी कौशलच्या बरोबर अशा अभिनेत्रीला कास्ट करण्यात येणार होते, जी तिच्यापेक्षा वयाने मोठी दिसेल आणि निर्मात्यांना ती गोष्ट सारामध्ये दिसत नाही. त्यामुळे सारा अली खानला चित्रपटातून बाहेर पडावे लागत आहे. याआधी चित्रपटात तरुण स्त्रीची भूमिका होती, त्यामुळे साराला साइन करण्यात आले. त्यानंतर जेव्हा कथा बदलली तेव्हा त्यासोबत अभिनेत्रीची भूमिका देखील बदलली. (Bollywood)

Sara Ali Khan Replaced In Upcoming Bollywood Movie
Esmayeel Shroff Passes away: सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे निधन
Samantha Ruth Prabhu Image
Samantha Ruth Prabhu ImageSaam Tv

निर्मात्यांनी साराला ऐवजी साऊथची करीना म्हणजेच अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. अद्याप निर्मात्यांनी यावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर करणार आहेत. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शनही सुरू झाले आहे. या चित्रपटाची कथा महाभारतातील अश्वत्थामा या पात्रावर आधारित आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे पाहावे लागेल. (Sara Ali Khan)

'द फॅमिली मॅन 2' मधील तिच्या अभिनयाने लोकांना प्रभावित केल्यानंतर, समंथा रुथ प्रभूकडे आजकाल अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट आहेत. अशी ही चर्चा होत आहे की ती लवकरच अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. तसेच ती आयुष्मान खुरानासोबत सुद्धा स्क्रीन शेअर करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com