मराठमोळा रिलस्टार प्रथमेश कदमचं निधन झालंय
काही महिन्यांपूर्वी आजारपणातही हॉस्पिटलमधूनही प्रथमेश रिल्स बनवत होता
त्याचे आई प्रज्ञा कदमसोबतचे रिल्स लोकप्रिय होते
प्रथमेशच्या मित्र आणि चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली
सोशल मीडियावर मराठमोळा रिलस्टार, इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून रिलस्टार प्रथमेश आजारी होता. प्रथमेशच्या निधनानंतर त्याच्या मित्रांनी ही दु:खद माहिती दिली. त्याच्या जाण्याने सोशल मीडियावरील चाहत्यावर्गावर शोककळा पसरली आहे. निधनानंतर त्याचे हॉस्पिटलमधील व्हिडिओही चर्चेत आले आहेत.
प्रथमेश कदम आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांचे रिल्स सोशल मीडियावर चांगले चर्चेत असायचे. त्याच्या व्हिडिओंना चाहत्यांकडून चांगली पंसती मिळायची. प्रथमेशच्या रिल्सचं बॉलिवूड आणि मराठी कलाकार कौतुक करायचे. अनेक रिल्सस्टार देखील त्याचं तोंडभरून कौतुक करायचे.
काही वर्षांपूर्वी प्रथमेशच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनाने मोठा आधार गमावलेल्या प्रथमेशवर संपूर्ण घराची जबाबदारी आली होती. या काळात प्रथमेशने जबाबदारी सांभाळून आईला आधार दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून प्रथमेश आणि त्याची आई रिल्स बनवायचे. प्रथमेश सोशल मीडियावर लोकप्रिय होता.
काही महिन्यांपूर्वी प्रथमेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील प्रथमेश रुग्णालयात रिल्स बनवून चाहत्यांना हसवत होता. त्याने त्यावेळी रुग्णालयात असताना दोन रिल्स व्हिडिओ तयार केले होते. ते दोन्ही व्हिडिओ आता चर्चेत आले आहेत.
प्रथमेशच्या निधनानंतर त्याचा खास मित्र तन्मय पाटेकर यानेही खास पोस्ट केली आहे. ' तू कायम आमच्या आठवणीत राहशील. देवाघरी स्वतःची काळजी घे रे. तुझी खूप आठवण येईल, मिस यू भाई, असे तन्मयने पोस्ट करत म्हटलंय. 'तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कुणाशी करू, असे गाणेही त्याने पोस्टला दिलं. निधनानंतर प्रथमेशचे मित्र आणि त्याचे चाहते सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.