Prathamesh Kadam saam tv
मनोरंजन बातम्या

Prathamesh Kadam : रील स्टार प्रथमेश कदमचा मृत्यू नेमका कशाने झाला? आईने रडत रडत सांगितले खरे कारण, पाहा VIDEO

Prathamesh Kadam Death Reason : रील स्टार प्रथमेश कदमचे अलिकडेच निधन झाले. आता त्याच्या आईने एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी प्रथमेशच्या मृत्यूचे खरे कारण सांगितले आहे.

Shreya Maskar

जानेवारी महिन्यात रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन झाले.

प्रथमेशच्या आईने व्हिडीओ शेअर करून प्रथमेशच्या मृत्यूचे खरे कारण सांगितले आहे.

प्रथमेश कदम प्रसिद्ध मराठी रीलस्टार होता.

सोशल मीडियावर प्रसिद्ध मराठी रीलस्टार आणि कंटेंट क्रिएटर प्रथमेश कदम याचे 26 जानेवारी 2026ला निधन झाले. त्याच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांच्या मृत्यूची अनेक कारणे समोर आली. कोणी म्हटलं आत्महत्या केली. तर कोणी डेंग्यू असल्याचे सांगितले. अनेक अफवाही पसरल्या. मात्र आता प्रथमेश कदमच्या निधनाचे खरे कारण समोर आले आहे. प्रथमेशच्या आईने रिल स्टार प्रज्ञा कदम यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून यासंबंधित माहिती दिली आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

प्रथमेशच्या आईने सांगितल्यानुसार, प्रथमेशच्या रक्तात कावीळ मिसळली होती. ती म्हणजे सफेद कावीळ (White Jaundice) होती. डॉक्टरांना सुरूवातीला प्रथमेशला सफेद कावीळ झाल्याचे समजले नाही. शेवटच्या क्षणी डॉक्टरांना कळले. जेव्हा डॉक्टरांनी रिपोर्ट केले तेव्हा नॉर्मल आले. डॉक्टरांनी प्रथमेशच्या आईला खात्री दिली होती की, दोन-तीन दिवसात प्रथमेश बरा होईल, म्हणून त्याला ॲडमिट केले होते. मात्र अखेर कावीळमुळे प्रथमेशचे निधन झाले.

संपूर्ण शरीरात, रक्तात कावीळ पसरली होती. व्हिडीओच्या शेवटी प्रथमेशच्या आईने हात जोडून चाहत्यांना खोट्या अफवा पसरवू नका, अशी विनंती केली आहे. प्रथमेशच्या आईने त्यांना थोडा वेळा द्यावा, अशी देखील विनंती केली आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, "कृपया अफवा पसरवणे थांबव... कमेंट्स, कॉल्स थांबवा मित्रांनो... लवकरच परत भेटूया..." प्रथमेश कदमच्या अशा अचानक जाण्याने कलाकारांनाही मोठा धक्का बसला होता.

प्रथमेश कदम आणि त्याच्या आईचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ते अनेक विषयांवर सुंदर रील बनवायचे. प्रथमेशच्या रीलमध्ये आई आणि बहिणी कायम दिसायचे. माय-लेकाची जोडी इंटरनेटवर खूप प्रसिद्ध होती. त्यांचे इन्स्टाग्रामवर 196K फॉलोअर्स आहेत. प्रथमेश आणि त्याची आई कॉमेडी आणि भावनिक व्हिडीओ बनवायचे. प्रथमेश आपल्या करिअरमध्ये खूपच उत्तम होता. चाहत्यांसाठी रोज नवीन काही तरी करायचा आणि त्यांना हसवायचा. प्रथमेशच्या आईच्या या व्हिडीओने सर्व चर्चांना अखेर पूर्ण विराम मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावात वीज कर्मचारी आज संपावर

मोठी बातमी! शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, कर्जमाफीची महत्त्वाची अपटेड समोर, ‘या’ १४ जिल्ह्यांना सर्वाधिक पैसे

धक्कादायक! मदतीसाठी आलेल्या तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा, पुन्हा बुधवार पेठेत पाठवले, पुण्यातील धक्कादायक घटना

Today Horoscope: अनोळखी लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक करू नका; या ४ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

Bank Closed Today: आज बँकांचाही संप; SBI, HDFC ते PNB... कोणत्या बँका सुरु, कोणत्या बंद? वाचा यादी

SCROLL FOR NEXT