Sunny Marathi Movie Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunny Teaser: तरुणांना प्रेरणा देणाऱ्या 'सनी' चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

'सनी' शिक्षणासाठी परदेशात गेल्याचे दिसत असून त्याला पाठीमागे काहीतरी सोडून आल्याची सतत जाणीव होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मराठी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर #घरापासून_दूर या ट्रेंडचा चांगलाच बोलबाला सुरु आहे. यात बऱ्याच मराठी कलाकारांनी हॅशटॅगचा वापर करत पोस्ट केली होती (Social Media). प्रामुख्याने हेमंत ढोमे, ललित प्रभाकर, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर या कलाकारांचा (Marathi Actor) समावेश होता. तेव्हा नेटकरी या पोस्ट्सकडे फक्त एक पोस्ट म्हणून पाहत होते. कालांतराने ट्रेंडने जोर धरल्यानंतर अनेकजण या मागील तर्कवितर्क काढतानाच गुपित सर्वांच्या समोर आले आहे.

'झिम्मा' चित्रपटाच्या भरघोस यशानंतर हेमंत ढोमे आपला नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर सोशल मीडियावर झळकले असून #घरापासूनदूर चे उत्तर मिळाले आहे. टीझरमध्ये ललित प्रभाकर म्हणजेच 'सनी' शिक्षणासाठी परदेशात गेल्याचे दिसत असून त्याला पाठीमागे काहीतरी सोडून आल्याची सतत जाणीव होते. असे म्हणतात, लांब गेल्यावरच जवळचे सापडते. असाच काहीसा अनुभव सनीला येत असल्याचे यात दिसत आहे. (Latest Marathi News)

त्याच्या मनात चाललेली ही चलबिचल नेमकी कशासाठी आहे, याचे उत्तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित, या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी चित्रपटाचे निर्माते आहेत. तर संतोष खेर आणि तेजस्वनी पंडित सहनिर्माते आहेत. (Tajya Batmya)

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमेन म्हटलं की, ''खरंतर ही माझीच गोष्ट आहे पण कधी ना कधी घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे, अनेकदा असे होते, घरापासून दूर गेल्यावर काही गोष्टींची किंमत आपल्याला कळते आणि कदाचीत नवी नाती, नवीन जग सापडते. आपल्या आयुष्याला नवा आकार येतो आणि आपली सर्वार्थाने वाढ होते. हेच अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न 'सनी'मध्ये करण्यात आला आहे. संपुर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा एक मजेशीर चित्रपट आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: हितशत्रूपासून सावध रहाणं गरजेचं, वाचा आजचं राशीभविष्य

Success Story: झाडूने बदललं आयुष्य, २५ हजारात सुरु केला व्यवसाय, आज कमावते १२ लाख रुपये, सोनिकाची सक्सेस स्टोरी वाचा

Maharashtra Election: अजित पवारांविरोधात प्रतिभा पवार मैदानात; दादांचा सवाल, पवारांचा पलटवार

Maharashtra weather : पावसाची उघडीप, किमान तापमानात घट, कसं असेल आजचे वातावरण

Assembly Election: माण-खटावमध्ये होणार काँटे की टक्कर; जयकुमार गोरेंना प्रभाकर घार्गेंचं आव्हान

SCROLL FOR NEXT