Subhedar Collection Saam TV
मनोरंजन बातम्या

Subhedar Collection: 'सुभेदार'ची शिवगर्जना प्रेक्षकांपर्यंत पोहोचली; दुसऱ्या दिवशीही चित्रपटाची कोट्यवधींची कमाई

Subhedar Day 2 Box Office Collection: दोन दिवसात चित्रपटाने कोट्यवधींचे कलेक्शन केले आहे.

Pooja Dange

Subhedar Show Goes Housefull:

दिग्पाल लांजेकर यांच्या शिवअष्टक मालिकेतील पाचवं पुषक असलेला 'सुभेदार' हा चित्रपट शुक्रवारी म्हणजे २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे मित्र तानाजी मालुसरे यांच्या कोंढाण्याच्या लढाईवर हा चित्रपट आधारित आहे.

चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रेकॉर्ड करत प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग देखील मोठ्या प्रमाणात झाले होते. तर आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये हाऊस फुल्लचे बोर्ड लागले आहेत. दोन दिवसात चित्रपटाने कोट्यवधींचे कलेक्शन केले आहे.

सॅकनिल्कला 'सुभेदार'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार 'सुभेदार' चित्रपटाने दोन दिवसात २.७४ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

'सुभेदार' चित्रपटाने पहिल्या दिवशी १.०५ कोटी, दुसऱ्या दिवशी १.६९ कोटींचे कलेक्शन केले आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी हा चित्रपट १.८० कोटींची कामे करू शकतो असे अहवालात म्हटले आहे.

चित्रपटाचे पहिल्या दिवशी कलेक्शनपेक्षा दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन जास्त आहे.

चित्रपटाच्या प्रमोशन ऍक्टिव्हिटी, माऊथ पब्लिसिटी आणि निर्णयांनी केलेल्या विविध उपक्रमाचा होताना दिसत आहे. (Latest Entertainment News)

कलाकार

आऊसाहेब- मृणाल कुलकर्णी, छत्रपती शिवाजी महाराज- चिन्मय मांडलेकर, सोयराबाई- नूपुर दैठणकर, तान्हाजी मालुसरे- अजय पूरकर, शेलार मामा- समीर धर्माधिकारी, सूर्याजी -अभिजीत श्वेतचंद्र, सावित्री- स्मिता शेवाळे, पार्वतीबाई- उमा सरदेश्मुख, रायबा- अर्णव पेंढरकर, यशोदा- शिवानी रांगोळे, येसाजी कंक - भूषण शिवतरे, मोरोपंत- श्रीकांत प्रभाकर, बाजी जेधे- बिपीन सुर्वे, जनागराडीण- अलका कुबल, शेलार- मा.राजदत्त, शेलार मुलगी- ऐश्वर्या शिधये, हिरोजी इंदुलकर- सौमित्र पोटे, पीलाजी नीळकंठ- संकेत ओक, बाजीपासलकर- सुनील जाधव, जानोजी- मंदार परळीकर, जीवा- विराजस कुलकर्णी, रंभाजी- अजिंक्य ननावरे, उदयभान- दिग्विजय रोहिदास, कुबादखान- रीषी सस्केना, अचलसिंह- ज्ञानेश वाडेकर, केसर- मृण्मयी देशपांडे, बहिर्जी नाईक- दिग्पाल लांजेकर, विश्वास- आस्ताद काळे, नवलाजी- पूर्णानंद वाडेकर या सर्व कलाकारांनी चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT