Sant Dnyaneshwaranchi Muktaai Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sant Dnyaneshwaranchi Muktaai : संत मुक्ताबाईंची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर येणार, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा प्रोमो रिलीज

Sant Dnyaneshwaranchi Muktaai Promo : संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर कायमच आपल्या शिवराज अष्टक चित्रपटांमुळे चर्चेत असतात. पण आता ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. खरंतर महाराष्ट्र हा साधुसंताचा महाराष्ट्र. या महाराष्ट्रात अनेक संत महंत होऊन गेले आहेत. त्यातील काही संत म्हणजे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई हे होय. नुकतंच संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला देहदंड स्वीकारावा लागला. मातापित्याच्या देहत्यागानंतर हे अनन्य साधारण कुटुंब सांभाळण्याची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. तिने आईच्या निसर्गदत्त भावनेने ती पेलली. आपल्या भावंडांची जणू ती माऊलीच झाली. पुढे मुक्ताई १४०० वर्षाच्या चांगदेवांची अध्यात्मिक गुरु बनली. मुक्ताबाईंचे साधेपण अर्थपूर्ण विचार आपल्याला आजही विचार करायला भाग पाडतात आणि स्त्री मुक्तीची वेगळीच जाणीव निर्माण करत प्रेरणाही देतात. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट २ ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय.

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अलौकिक भावंडांच्या भूमिकेत नेमकं कोण असणार? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका पोस्टरमधून लहानपणीच्या ‘मुक्ताई’ आणि ‘ज्ञानेश्वर’ यांची चैतन्यमय झलक पहायला मिळते आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टर मध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि गोडुल्या मुक्ताच्या भूमिकेत चिमुकली ईश्मिता जोशी दिसत आहे. ‘मुक्ताई’ने निभावलेल्या माता, भगिनी, गुरु अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहेत.

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रे प्रथमेश अवसरे यांचे आहेत. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीसंयोजन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज आणि उद्या सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Beed News: बीडमध्ये रस्ता पाहणीदरम्यान ट्रक खड्ड्यात कोसळला|VIDEO

Shahapur News : टॉयलेटमध्ये रक्त आढळलं, विद्यार्थिनींची विवस्त्र करून तपासणी केली; शहापूरच्या इंग्लिश मीडियम शाळेतील प्रकार

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

SCROLL FOR NEXT