Dharmaveer 2 Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dharmaveer 2 Movie: 'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' 'धर्मवीर २' मधून उलगडणार, ठाण्यातून चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात

Dharmaveer 2 Movie Update: या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर आणि तुफान यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priya More

Dharmaveer 2 Shooting:

ठाण्यामध्ये शिवसेना पक्ष (Shivsena Party) बळकट करणारे आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती दिली. या चित्रपटाला शिवसैनिकांसह प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते.

या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर आणि तुफान यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच धर्मवीर २ या चित्रपटाची घोषणा झाली होती. आता या चित्रपटाच्या शूटिंगला धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या ठाण्यातूनच सुरूवात झाली आहे.

'धर्मवीर भाग २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रविण तरडे यांनी ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्रोत्सवात घोषणा केली. 'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' आगामी धर्मवीर भाग दोनमधून समोर येणार असल्याचे प्रविण तरडे आणि चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी स्पष्ट केले. 'धर्मवीर २' (Dharmaveer 2) चित्रपटाचे ठाण्यातील टेंभीनाक्यावर चित्रण करण्यात आले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने या चित्रपटाला सन्मानित करण्यात आलं होतं. या चित्रपटाला मिळाल्या यशानंतर धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याचे बोलले जात होते. अखेर ९ ऑगस्टला या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन ‘धर्मवीर २’ची घोषणा केली होती.

अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने ‘धर्मवीर’ (Dharmaveer) या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर प्रवीण तरडे यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

दरम्यान, प्रवीण तरडेच ‘धर्मवीर २’ चे लेखन, दिग्दर्शन करणार असल्याने हा चित्रपटही दमदार होईल यात शंका नाही. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर ‘धर्मवीर २’ "साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..." अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली होती. या चित्रपटात कोण-कोणते कलाकार असणार आहेत हे अद्याप समोर आले नाही. ‘धर्मवीर २’ चित्रपट लवकरच भेटीला येणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scholarship Exam 2025-26 : शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शिष्यवृत्ती परीक्षा आता पूर्वीप्रमाणे ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी

Maharashtra Live News Update: वेण्णालेक येथे अडकलेली बोट बाहेर काढण्यात आली, पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास

भाजप नेत्याच्या बेडरूमला आग, रॉकेट थेट बाल्कनीत घुसला; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं अन्..

Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

Diwali Padwa Marathi Wishes: दिवाळी पाडवानिमित्त व्यक्त करा आपले प्रेम! आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT