Aamir Khan Bungalow: आमिर खानच्या मुंबईतील बंगल्यावर चालणार 'हातोडा', काय आहे कारण?

Aamir Khan Bungalow Demolished : आमिर खानच्या मुंबईतील बंगल्यावर चालणार 'हातोडा', काय आहे कारण?
Aamir Khan Bungalow Demolished
Aamir Khan Bungalow DemolishedSaam Tv

Aamir Khan Bungalow Demolished :

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आजकाल अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. त्याचा मुलगा जुनैद खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यासोबतच अलीकडेच तो चेन्नईला शिफ्ट होणार असल्याची बातमी आली होती.

या सर्व बातम्यांदरम्यान, मुंबईतील पॉश पाली हिल भागात असलेलं आमिर खानचं अपार्टमेंट पाडले जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. आमिरचे बेस्टा आणि मरीना अपार्टमेंटमध्ये घरे आहेत. आमिर त्याचे हे घर पाडून तो पूर्वीपेक्षा अधिक आलिशान आणि नेचर फ्रेंडली बंगला बनवणार आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Aamir Khan Bungalow Demolished
Gaafil Poster Out: गोष्ट एका अनोळखी नात्याची!‘गाफील’चं पोस्टर लॉन्च, १५ डिसेंबरला येणार भेटीला

आमिर खान हा भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे, हे सर्वांना माहीत आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, नवीन तंत्रज्ञान आणि वर्ल्ड क्लास घर बांधण्यासाठी आमिर आपले हे जुने घर पाडत आहे. या कामासाठी Atmosphere Realty नावाच्या रिअल इस्टेट फर्मला काम देण्यात आल्याचे, मनी कंट्रोलच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. आमिर खानला या प्रोजेक्टमध्ये खूप रस असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कामादरम्यान, आमीर चेन्नईला जाण्याचा विचार करत आहे. कारण त्याची आई झीनत हुसैनची प्रकृती बरी नसल्याने आमिर काही आठवड्यांसाठी चेन्नईला जाणार आहे.  (Latest Marathi News)

चेन्नईतील एका हॉटेलमध्ये राहणार आमिर खान

झीनत हुसैन यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आमिर खान रुग्णालयाजवळील हॉटेलमध्ये राहणार आहे. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर आमिरला लाल सिंग चड्ढा या चित्रपटात शेवटचा दिसला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. याआधी त्याने 'लगान', 'दिल', 'दंगल', '3 इडियट्स', 'पीके'सह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

Aamir Khan Bungalow Demolished
Dunki Release Date: पुन्हा बदलली शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाची रिलीज डेट; नेमकं काय आहे कारण?

दरम्यान, आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्याने दोनदा लग्न केले. आमिर खानने त्याची पहिली पत्नी रीना दत्ताशी 18 एप्रिल 1986 रोजी लग्न केले आणि त्यांना जुनैद खान आणि आयरा खान ही दोन मुले आहेत. आमिर आणि रीना 16 वर्षांनी वेगळे झाले. त्यानंतर 2015 मध्ये आमिरने किरण रावशी दुसरे लग्न केले. आमिर आणि किरणच्या मुलाचे नाव आझाद राव खान आहे. मात्र, जवळपास 16 वर्षे एकत्र राहिल्यानंतर आमिर आणि किरण 2021 मध्ये वेगळे झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com