Madhuri Dixit And Shriram Nene
Madhuri Dixit And Shriram Nene Saam Tv
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit: 'पंचक'च्या यशासाठी माधुरी दीक्षित सिद्धिविनायक चरणी, VIDEO व्हायरल

Priya More

Panchak Movie:

२०२४ या वर्षाचा पहिला आठवडा मराठी सिनेरसिकांसाठी खूपच खास असणार आहे. या आठवड्यात ३ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधील एक चित्रपट म्हणजे 'पंचक'. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि श्रीराम नेने यांनी निर्मिती केलेला 'पंचक' ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. या चित्रपटाला यश मिळावे यासाठी माधुरी दीक्षितने सहकुटुंब सिद्धिविनायकाच्या चरणी माथा टेकला.

माधुरी दीक्षित तिचा आगामी चित्रपट 'पंचक'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी माधुरी दीक्षितने पती श्रीराम नेने, मुलगा अरीन, रायन, वडील माधव नेने, आई अनू नेने यांच्यासह प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराला (siddhivinayak temple) भेट दिली. या सर्वांनी बाप्पा चरणी नथमस्तक होत चित्रपटाला यश मिळावे यासाठी प्रार्थना केली. माधुरी दीक्षित सिद्धिविनायकाच्या दर्शनला आल्याचे कळताच चाहत्यांनी मंदिराबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी चाहत्यांनी माधुरीला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. यात शुभ-अशुभ घडले की ते पाच पटीने वाढते. याच संकल्पनेवर आधारित असलेला 'पंचक' चित्रपट (Panchak Movie) येत्या ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. ते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, पंचक चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर आणि गणेश मयेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठलाला तुळशीहार का वाहतात?

Termeric Water Benefits: पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या झटपट वजन कमी करा

Indian Cricket's Net Worth | विश्वविजेत्या भारतीय क्रिकेटर्सच्या संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल

Success Story : २० वर्षे बँकेत नोकरी, ५० व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय; देशातील सर्वात श्रीमंत महिला CEO बद्दल जाणून घ्या!

Dive Ghat Pune : पुण्यातील दिवे घाटात दुचाकीसमोर अचानक बिबट्या आला अन्....पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT