Lagnacha Shot Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Lagnacha Shot: मराठी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’चे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटातून प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Lagnacha Shot: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. पोस्टरमधून चित्रपटातील प्रमुख कलाकारांची घोषणा करण्यात आली असून, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर ही फ्रेश जोडी प्रथमच एकत्र पडद्यावर झळकणार आहे. केवळ नावामुळे उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाने आता पोस्टरमुळे चर्चेला आणखी वेग दिला आहे.

पोस्टरमध्ये नायक-नायिका पारंपरिक लग्नाच्या पोशाखात उभे दिसतात. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील गोंधळलेले आणि प्रश्नार्थक भाव काहीतरी वेगळंच सांगतात. विशेष म्हणजे दोघांनीही डोक्याला बंदूकसारखी बोटं लावलेली देहबोली घेतली असून, यामुळे “लग्नाच्या आनंदात एखादा मोठा गोंधळ होणार आहे का?” असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतो. हे दृश्य पाहताच चित्रपटाची कथा केवळ साध्या लग्नाभोवती फिरणारी नसून, त्यात मजेशीर वळणं असणार हे स्पष्ट होतं.

पोस्टरच्या पार्श्वभूमीत रेल्वे, बस, वळणावळणाचे रस्ते आणि राशीचक्र अशा अनेक प्रतीकात्मक घटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यासोबतच ‘लग्नाअगोदरही लग्नानंतरही’ हे शब्द लक्ष वेधून घेतात. यावरून प्रवास, वेळेचा गोंधळ, चुकीचे निर्णय आणि नशिबाचे खेळ या सगळ्यांचा कथेशी जवळचा संबंध असणार असल्याची झलक मिळते. रंगीबेरंगी आणि उत्साही मांडणीमुळे चित्रपटाचा हलकाफुलका, विनोदी आणि मनोरंजक सूर ठळकपणे समोर येतो.

या चित्रपटाबाबत दिग्दर्शक अक्षय गोरे सांगतात की, ‘लग्नाचा शॉट’ ही लग्नाच्या गोंधळाकडे मजेशीर नजरेने पाहणारी गोष्ट आहे. कोणताही गंभीर संदेश न देता, संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून आनंदाने पाहता येईल असा निव्वळ मनोरंजनाचा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म्स यांच्या सहयोगाने साकारलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. संगीताची जबाबदारी प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली आहे. ६ फेब्रुवारी रोजी ‘लग्नाचा शॉट’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या अनोख्या लग्नकथेसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rubaab Teaser: तुझ्यासारखी नको तूच पाहिजे...,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार एक रुबाबदार लव्हस्टोरी

Jabrata: टीव्हीची प्रसिद्ध जोडी मोठ्या पडद्यावर; चित्रपटाचं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, रिलीज डेट काय?

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार

आता WhatsApp Chat नको असलेले डिलिट करा, हवे असलेले ठेवता येणार, नवं फीचर आलं, कटकट संपली!

Surupsingh Naik Passes Away: आदिवासी युवकांचा आधारस्तंभ हरपला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

SCROLL FOR NEXT