Jhimma 2 Release Date Declared Instagram
मनोरंजन बातम्या

Jhimma 2 Release Date: हरवलेल्या मैत्रिणी पुन्हा एकत्र येऊन धम्माल करणार, ‘झिम्मा २’ची रिलीज डेट आली समोर

Jhimma 2 Release Date Announced: हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ची रिलीज डेट आली समोर आली आहे.

Chetan Bodke

Jhimma 2 Release Date Declared

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता. आता चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘झिम्मा’चा सिक्वेल येणार आहे. ‘झिम्मा’च्या वर्षपुर्तीनिमित्त सोशल मीडियावर ‘झिम्मा २’ची घोषणा केली होती. नुकताच आज निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. एका पोस्टरद्वारे निर्माते जिओ स्टुडिओज आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्स, चलचित्र मंडळी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शन दिले की, “प्रवासात आपण असे मित्र बनवतो जे कदाचित रोज भेटणार नाहीत… पण मागच्या खेपेला जिथं थांबलं होतं तिथनं पुन्हा सुरू होतात… पण त्यासाठी REUNION महत्त्वाची! आणि आपली REUNION होणार २४ नोव्हेंबर पासून! भेटूया चित्रपटगृहात… (मागच्या खेपेसारखं…)”

हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित चित्रपटाचे निर्माते ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग असून चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे आहेत. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत या लोकप्रिय कलाकारांची तगडीस्टार कास्ट पाहायला मिळणार आहे.

महत्वाचं म्हणजे या कलाकारांच्या टीम मध्ये काही नवीन सदस्यही सामील होणार आहेत अशी चर्चा आहे. ‘झिम्मा २’ पुन्हा एकदा आनंदाचा खेळ खेळायला, पुर्नःभेटीचा अविस्मरणीय अनुभव द्यायला २४ नोव्हेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर, ओढ्याला पूर आल्यामुळे पिंगळी लिमला रस्त्यावरची वाहतूक बंद

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT