Jhimma 2 Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhimma 2 Collection: हेमंत ढोमेच्या ‘झिम्मा २’ची छप्परफाड कमाई, रणबीरच्या ‘ॲनिमल’वरही पडला भारी

Jhimma 2 Box Office Collection: बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांना टक्कर देत 'झिम्मा २'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

Chetan Bodke

Jhimma 2 Box Office Collection

बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांना टक्कर देत 'झिम्मा २'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. आजही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने २०२३ च्या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' हा चित्रपट २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर 'झिम्मा २'ने रिलीज झाल्यापासून तब्बल १३ कोटींची कमाई केली आहे.

2023 हे वर्ष खरंतर मराठी चित्रपटांसाठी खूप खास ठरलं आहे. सर्वात आधी 'वेड', 'बाईपण भारी देवा' आणि आता 'झिम्मा २' या तिनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश संपादन केले आहे. 'झिम्मा २'ची कथा सगळ्यांना भावली असून जगभरात चित्रपटाचे कौतुक आहे. 'झिम्मा २'ची कमाई ही अपेक्षेपलिकडची आहे.

सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये ७.४ कोटी तर दुसऱ्या आठवड्यामध्ये ३.२२ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने एकूण १३ कोटींची कमाई केलेली आहे.

‘झिम्मा’चा पहिला भाग गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. ‘झिम्मा’च्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर, सेलिब्रिटींकडूनही आणि समीक्षकांकडूनही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सुपरडुपरहिट चित्रपटांच्या यादीमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. (Marathi Film)

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपट गेल्या २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर या तगड्या स्टारकास्टने मुख्य भूमिका साकारली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT