विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज ४’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. २०१७ मध्ये ‘बॉईज’, २०१८ मध्ये ‘बॉईज २’ २०२२ मध्ये ‘बॉईज ३’ आणि येत्या २० ऑक्टोबरला ‘बॉईज ४’. प्रत्येक सीझनप्रमाणे हा सीझन सुद्धा प्रचंड चर्चेत येणार यामध्ये काही शंका नाही. ‘बॉईज’ची कथा आपल्याला ढुंग्या, धैर्या आणि कबीर या त्रिकुटांभोवती फिरताना दिसते.
या तिघांनाही प्रेक्षकांनी दिलेल्या अफाट प्रेमापायी चित्रपटाची कायमच चर्चा होतेय. नुकतंच चित्रपटाच्या टीमने ‘साम टिव्ही’सोबत संवाद साधला. यावेळी जर चित्रपटामध्ये पार्थ भालेराव, प्रतिक लाड, सुमंत शिंदे या तिघांऐवजी जर इतर दुसऱ्या कोणत्या कलाकारांना चित्रपटामध्ये कास्ट करायचे ठरले असते, तर कोणाला कास्ट केलं असतं? यावर दिग्दर्शकांनी आपलं मत मांडलंय.
मुलाखतीत दिग्दर्शक म्हणाले. जर या त्रिकुटांना न घेता दुसऱ्या कलाकारांना घेतलं असतं, तर तो भलताच कुठला तरी चित्रपट झाला असता. खरंतर पार्थ, प्रतिक आणि सुमंत यांना घेऊनच बॉईज चित्रपट झाला असता, त्यांच्या शिवाय इतर कोणालाही मी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत पाहत नाही. चित्रपटाची कथा मी त्यांना नजरेसमोर ठेवूनच लिहिली आहे. त्यांच्यापासूनच हा चित्रपट एक लहानाचा मोठा झाला आहे. तर अभिनय आणि गौरव यांच्याबद्दलही तसंच झालं. त्यांच्याऐवजी ही मी दुसरं कोणालाच चित्रपटामध्ये पाहत नाही.
कलाकारांविषयी सांगताना अभिनेत्याने मुलाखतीत सांगितले, “मी अभिनय आणि गौरव यांनाही नजरेसमोर ठेवून ‘बॉईज ४’ची कथा लिहिली होती. म्हणूनच मी चित्रपटासाठी इतके वर्ष थांबलो, खरंतर माझी स्क्रिप्ट २०१८मध्येच पूर्ण झाली होती. मुख्य बाब म्हणजे, सर्व गणितं जमवून केलेला हा चित्रपट आहे. आम्ही योग्य वेळ घेऊनच चित्रपटाची निर्मिती केली आहे. मला या चित्रपटामध्ये हवे असलेले कलाकार आणि त्या कथानकालाही आधारित असलेले कलाकार ही मला चित्रपटात हवे होते. या सर्व गोष्टींची जमवा जमव करायला वेळ लागतो. म्हणून आम्हाला या चित्रपटासाठी जरा वेळ लागला..”
चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत पार्थ भालेराव, प्रतिक लाड, सुमंत शिंदे, रितीका श्रोत्री, अभिनय बेर्डे, यतिन कार्येकर, समीर धर्माधिकारी, गौरव मोरे, निखिल बने, जुई बेंडखले, ऋतुजा शिंदे, ओम पाटील अशी स्टारकास्ट आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.