Subhedar Film 1st Song Release: दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवराज अष्टक’मधील चित्रपटांची कायमच चर्चा होत असते. ‘शिवराज अष्टक’मधील पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्या चित्रपटाचे नाव ‘सुभेदार’ असून या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तुफान चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरनंतर चित्रपटातील आज पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘मावळ जागं झालं रं’ असे या गाण्याचे बोल आहेत.
सोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे प्रेक्षकांना आनंद झालाय. चित्रपटाच्या कथेत नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भावनिक आणि कौटुंबिक आयुष्य दाखवत त्यांचे शौर्य आणि पराक्रम दिग्दर्शक उलगडणार आहेत. आज ‘सुभेदार’चं पहिलं गाणं प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांनी गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यातून महाराजांना तळपत्या सुर्याची उपमा देण्यात आली आहे. या गाण्यातून प्रेक्षकांना महाराजांचे शेतकरी प्रेम सोबतच त्यांच्याविषयी आदर आणि सन्मान देखील दिसणार आहे.
गाण्यामध्ये, महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर दिसत असून विराजस कुलकर्णी आणि दिग्पाल लांजेकर देखील गाण्यामध्ये दिसत आहेत. हे चित्रपटातील पहिलं गाणं असून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दलची उत्सुकता फारच शिगेला आहे.
‘सुभेदार’ चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या तारखेत बदल केला. चित्रपट १८ ऑगस्ट अर्थात एक आठवडा आधीच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटातील कलाकारांविषयी बोलायचे तर, महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर, तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय पुरकर, सूर्याजी मालुसरेंच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, तर त्यांच्या पत्नी यशोदाबाईंची भूमिकेत शिवानी रांगोळे दिसणार आहे. तर तान्हाजी मालुसरे यांच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य मानले जाणारे शेलारमामा यांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी दिसणार आहे. सोबतच तान्हाजी मालुसरेंच्या मातोश्री पार्वतीबाईंच्या भूमिकेत उमा सरदेशमुख तर रायबाची भुमिका अर्णव पेंढारकर साकारणार आहे.
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्टला नाही तर १८ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘शिवराज अष्टक’मधील, ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ‘सुभेदार’ या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.