Krantijyoti Vidyalay Marathi Medium Saam Tv
मनोरंजन बातम्या

Krantijyoti Vidyalay: 'क्रांतिज्योती'ची पोरं महाराष्ट्रात सुपरहिट; पहिल्याच वीकेंडला केली कोट्यवधींची कमाई

Krantijyoti Vidyalay: ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला कोट्यवधींची कमाई केली आहे.

Shruti Vilas Kadam

Krantijyoti Vidyalay Marathi Movie: मराठी शाळेच्या अस्मितेला नवा आवाज देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच सोशल मीडियावर व बुक माय शोवर चित्रपट ट्रेंडिंग ठरत आहे. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला तब्बल ३.९१ कोटींचा गल्ला जमवला आहे. जोरदार कमाई करत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

पहिल्याच दिवसापासून अनेक शहरांमध्ये चित्रपट हाऊसफुल जात असून, मराठी शाळेच्या आठवणींमध्ये रमलेले प्रेक्षक भावुक होऊन चित्रपटगृहातून बाहेर पडताना दिसत आहेत. चित्रपटातील आशय, संवाद, भावनिक क्षण आणि वास्तववादी मांडणी यामुळे प्रेक्षकांशी थेट नाळ जुळली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे.

चित्रपटाच्या प्रभावी कथेची मांडणी, कलाकारांची नैसर्गिक अभिनयशैली, मनाला भिडणारे संगीत आणि प्रत्येक फ्रेममधून जाणवणारी मराठी मातीची ओढ यामुळे हा चित्रपट केवळ एक सिनेमा न राहता एक अनुभव ठरत आहे. समीक्षकांकडूनही या चित्रपटाला भरभरून दाद मिळत असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी सोशल मीडियावरून या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.

प्रेक्षकांकडून दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, राज्यभरातून त्यांना कौतुकाचे मेसेजेस आणि शुभेच्छा मिळत आहेत. अनेक प्रेक्षक चित्रपट पाहिल्यानंतर थेट दिग्दर्शकांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, हीच या कलाकृतीच्या यशाची खरी पावती ठरत आहे.

या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “प्रेक्षकांचे प्रेम पाहून मी अक्षरशः भारावून गेलो आहे. आमच्या प्रत्येक चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे, मात्र यावेळी विषय वेगळा होता. एक संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर मांडला व त्यांनी तो मनापासून स्वीकारला, याचे खूप समाधान वाटते. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद मला पुढेही अधिक प्रामाणिक आणि त्यांच्या आवडीचे चित्रपट घेऊन येण्याची प्रेरणा देतो. मी सर्व रसिकप्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानतो.”

क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला असून यात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

'V' Neck ब्लाउजची क्रेझ; साडीला देईल रॉयल लूक, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

Navi Mumbai : नवी मुंबईच्या लॉजमध्ये नको ते उद्योग, पोलिसांनी उद्ध्वस्त केले देहविक्रीचं रॅकेट; ७ महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT