Man Yedyagat zala Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Man Yedyagat zala Movie: स्वानंदी बेर्डे पडली सुमेध मुदगलकरच्या प्रेमात, लवकरत येतोय 'मन येड्यागत झालं'

Swanandi Berde And Sumedh Mudgalkar Movie: एका अनोख्या प्रेमाची आगळीवेगळी लव्हस्टोरी 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'मन येड्यागत झालं' (Man Yedyagat zala Movie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट येत्या १ मार्चला प्रेदर्शित होणार आहे.

Priya More

Man Yedyagat Zala Movie Release Date:

प्रेमाची परिभाषाही प्रत्येकासाठी निराळी असते. बरेचदा हे प्रेम एकतर्फी असल्याचंही पाहायला मिळालं आहे. या एकतर्फी प्रेमामुळे आलेल्या अडचणी, संकट कित्येकांनी जवळूनही पाहिली आहेत. अशातच एका अनोख्या प्रेमाची आगळीवेगळी लव्हस्टोरी 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'मन येड्यागत झालं' (Man Yedyagat zala Movie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट येत्या १ मार्चला प्रेदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

योगेश जाधवने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेमाची निराळी व्याख्या सांगणाऱ्या या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील कलाकार आहेत. चित्रपटाच्या नुकत्याच समोर आलेल्या टिझरने कलाकारांची ओळख करून दिली. या चित्रपटाच्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री स्वानंदी बेर्डे आणि अभिनेता सुमेध मुदगलकर हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. सुमेध मुदगलकरची भगवान श्रीकृष्ण म्हणून ओळख आहे.

स्वानंदी बेर्डेचा हा पहिलाच चित्रपट आहे. स्वानंदीने नाटक, एकांकिकातून रसिकांचे मन जिंकले. आता या चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. स्वानंदी आणि सुमेध यांची फ्रेश जोडी 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री श्वेता परदेशी ही सहकलाकार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

'श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन' अंतर्गत संदीप पांडुरंग जोशी आणि कुणाल दिलीप कंदकुर्ते निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश जाधव यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आणि निर्मिती प्रमुख पूनम घोरपडे यांनी बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटाच्या लिखाणाची जबाबदारी विकास जोशी, सुदर्शन पांचाळ यांनी सांभाळली आहे. तसेच संपूर्ण चित्रपट मयुरेश जोशी याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या चित्रपटामध्ये स्वानंदी आणि सुमेध यांच्या व्यतिरिक्त बाप्पा जोशी, सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत.

'मन येड्यागत झालं' या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या दिलाचा ठेका नक्कीच चुकवतील यांत शंका नाही. चित्रपटाच्या संगीताची धुरा निलेश पतंगेने सांभाळली आहे. तर गाणी सुदर्शन पांचाळ, सिद्धेश पतंगे लिखित आहेत. या चित्रपटाच्या गाण्यांना जावेद अली, आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, आनंदी जोशी, निलेश पतंगे यांनी त्यांचा सुमधुर आणि दमदार आवाज दिला आहे. स्वानंदी आणि सुमेध या नव्या जोडीचा नव्या प्रेमाचा रंग 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून येत्या १ मार्चपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT