Avdhoot Gupte On Abhishek Ghosalkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Avdhoot Gupte: '...मी कल्पनाच करु शकत नाही', अभिषेक घोसाळकरांसाठी अवधुत गुप्तेची भावुक पोस्ट

Priya More

Avdhoot Gupte On Abhishek Ghosalkar:

बोरिवरीतील माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे पुत्र आणि शिवेसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बोरीवलीच्या आयसी कॉलनीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे बोरीवरलीसह दहिसर परिसर हादरला. या घटनेप्रकरणी सर्वसानान्यांपासून ते सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अशामध्ये मरठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार अवधूत गुप्तेनेही (Avdhoot Gupte) सोशल मीडियावर भावुक पोस्ट केली आहे. अवधूत गुप्तेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अर्थात ट्विटरवर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, 'दहिसरचे माजी नगरसेवक आणि लाडके नेतृत्व अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू हा प्रत्येक दहिसर-बोरिवलीकर नागरिकांसाठी जितका धक्कादायक आणि दुःखद आहे तितकाच तो माझ्यासाठी देखील आहे.'

त्यांनी पुढे लिहिले की,'अत्यंत मृदू स्वभावाचे अभिषेक हे कायमच एक मनमिळावू आणि हसरे व्यक्तिमत्व होते. ते कायम लोकांच्या अडीअडचणींना मदतीसाठी धावून जात असत. कोरोना काळामध्ये आमच्या ‘सूर नवा ध्यास नवा‘ कार्यक्रमाच्या चित्रिकरणादरम्यान दररोज सेटवर दोन-चार लोक कोव्हिड पॉझिटिव्ह येत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्यापासून ते ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देण्यापर्यंत अभिषेक प्रचंड मदत करत. माझ्या आईच्या आजारपणात तर त्यांनी मोठ्या भावासारखी मदत केली.'

'अर्थात, त्यांना हा संस्कारांचा वारसा मिळाला तो त्यांच्या वडिलांकडून, म्हणजेच आमचे ज्येष्ठ स्नेही विनोदजी घोसाळकर यांच्याकडून. विनोदजींच्या दुःखाची मी कल्पनाच करू शकत नाही. दुःखाचा हा डोंगर पार करण्यासाठी आणि आपल्या सोबतच आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी लागणारी संपूर्ण शक्ती आई एकविरा त्यांना देवो! अभिषेकजींच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांचेच नव्हे, तर आम्हा समस्त दहिसर-बोरवलीकरांचे फार मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर अभिषेकजिंच्या आत्म्यास शांती देवो! ॐ शांती!!', असं लिहित त्यांनी अभिषेक घोसाळकर यांना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांची हत्या त्यांच्याच परिचित असलेल्या मॉरिस नोरन्हा उर्फ मॉरिस भाईने केली. कोरोना काळामध्ये मॉरिसने मोठ्या प्रमाणात समाजकार्य केले होते. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. समाजसेवा करणाऱ्या मॉरिस आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यामध्ये असा काय वाद होता की ज्यामुळे हत्या आणि आत्महत्यासारखी घटना घडली असा प्रश्न स्थानिक रहिवाशांना पडला आहे. राजकीय वैमनस्यातूनच ही घटना घडल्याची देखील चर्चा सुरू आहे. याप्रकरणाचा तपास बोरिवली पोलिसांकडून सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Maharashtra News Live Updates : भरधाव टिप्परने पाचवीच्या विद्यार्थ्याला चिरडलं, संतप्त नागरिकांनी पेटवला टिप्पर

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT