Lockdown Lagna Poster Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lockdown Lagna: प्रवीण तरडेच्या 'लॉकडाऊन लग्न'चे पोस्टर रिलीज, ८ मार्चला येणार भेटीला

Lockdown Lagna Poster Out: मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांच्या 'लॉकडाऊन लग्न' (Lockdown Lagna) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर रिलीज करण्यात आले.

Priya More

Actor Pravin Tarde:

२०२३ या वर्षात मराठी सिनेरसिकांच्या भेटीला वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आले. या चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप चांगले मनोरंजनही केले. आता २०२४ या वर्षात देखील मराठी सिनेररिकांच्या भेटीला अनेक चित्रपट येण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांच्या 'लॉकडाऊन लग्न' (Lockdown Lagna) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर रिलीज करण्यात आले. हा चित्रपट ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. नुकताच 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये प्रवीण तरडेचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणा आहे. या चित्रपटात प्रविण तरडेव्यतिरिक्त कोण-कोण कलाकार असणार आहे त्यांची नावं अद्याप समजू शकली नाहीत.

अमोल कागणे प्रस्तुत 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. पोस्टरवर असलेल्या मास्क, सँनिटायझर यावरून चित्रपटातून कोरोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचं दिसून येते आहे.

अमोल कागणे यांच्या 'हलाल', 'भोंगा', 'लेथ जोशी' या चित्रपटांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. आजवर अनेक विविध विषयांवर तब्बल १८ पेक्षा अधिक चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती ही अमोल कागणे स्टुडिओ यांनी केली असून त्यानंतर आता ते 'लॉकडाऊन लग्न' ही नवी गोष्ट घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटात कलाकार कोण आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

SCROLL FOR NEXT