Lokshahi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lokshahi Movie: राजकारणाच्या सारीपाटावर खेळून जाणार एक नवी खेळी…, 'लोकशाही' ९ फेब्रुवारीला येतोय भेटीला

Tejashree Pradhan Lokshahi Movie: अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटच्या लोकशाही चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Priya More

Lokshahi Movie Release Date:

मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) नवनवीन धाटणीचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी भेटीला येत आहेत. २०२३ प्रमाणे २०२४ मध्ये देखील अनेक चांगला कंटेट असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर काही चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. प्रेम कथा, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक या विषयांवर आधारित हे चित्रपट असणार आहे. अशामध्ये नुकताच 'लोकशाही' (Lokshahi Movie) चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटच्या लोकशाही चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

राजकारणातील महिलांचं अस्तित्व, घराणेशाही, सत्तासंघर्ष, निवडणुकांची रणधुमाळी, राजकीय कुरघोडी, पक्षांचा प्रचार आणि विजयाचा गुलाल 'लोकशाही' चित्रपटात पहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्यासोबतच अंकित मोहन, गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, अमित रियान, शंतनु मोगे, प्रसन्न केतकर, सुश्रुत मंकणी, अजिता कुलकर्णी, सोनल वाघमारे हे कलाकार देखील राजकारणाच्या खेळात धुरळा उडवणार आहेत.

लोकशाही ही एका घराणेशाहीतल्या एका मुलीच्या वैयक्तिक पेचप्रसंगाची कथा आहे. जी तणावग्रस्त राजकीय नाटकाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या नैतिक अनैतिक कृत्यांवर आधारित आहे. समाजकारणात रस असलेल्या राजकारणी घराण्यात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात अनपेक्षित घटनांची साखळी घडत जाते. जी साखळी तिच्या वडिलांच्या हत्येचं कारण बनते. सत्तेच्या हव्यासापोटी रक्ताच्याच नात्यांनी तिच्या वडिलांचा जीव घेतला आहे. मात्र हत्या आणि हत्यामागचा कट कोणाचा आहे हे चित्रपट रिलीज झाल्यानंतर म्हणजे ९ फेब्रुवारीलाच कळणार आहे.

लोकशाही चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली आहे. तर संजय अमर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. संजय अमर यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा लिहिली आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन संजय-राजी या जोडीने केले असून चित्रपटातील गाणी जयदीप बागवडकर आणि राजलक्ष्मी संजय यांनी गायली आहेत. तसेच संजय अमर आणि अल्ट्रा मराठीचे बिझनेस हेड शाम मळेकर यांनी गीतांना शब्द दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT