Shreyash Jadhav Felicitated: अभिनय क्षेत्रात महत्वाची आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेलिब्रिटींना ‘मिड डे शोबिझ आयकॅान्स २०२३’ हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार युवा दिग्दर्शक, निर्माता श्रेयश जाधवला मिळाला आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीत ‘आयकॅान डायरेक्टर ॲाफ दि यिअर’ या पुरस्काराने श्रेयशला सन्मानित करण्यात आलेय. यावेळी बॅालिवूडमधील अनुपम खेर, मनोज बाजपेयी, सनी लिॲानी, नुशरत भरूचा, फातिमा साना, सोनू निगम, सुभाष घई, पेन स्टुडिओजचे जयंतीलाल गाडा आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रेयश जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील एक तरूण चेहरा ज्यानं फार कमी वेळेत स्वतःचे नाव प्रसिद्धीझोतात आणलं. श्रेयशने नेहमीच प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण आशयाचे आणि जॅानरचे चित्रपट दिले. श्रेयश जाधव यांची निर्मिती असलेल्या ‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासह इतर नामांकित असे ३२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी ॲानलाईन बिनलाईन, बसस्टॅाप, बघतोस काय मुजरा कर अशा बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली.
२०१९ मध्ये श्रेयश यांनी खेळावर आधारित ‘मी पण सचिन’ या प्रेरणादायी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. तर नुकताच एक धमाकेदार विनोदी चित्रपट ‘फकाट’ त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. त्यालाही सिनेरसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या बऱ्याच चित्रपटांचे लेखन हे त्यांनी स्वतःच केले आहे. तरूणाईला आवडणाऱ्या, कौटुंबिक चित्रपट बनविणाऱ्या श्रेयश जाधव यापूर्वी यांना ‘विदर्भ रत्न पुरस्कार २०२१’ने सन्मानित करण्यात आलेय.
या पुरस्काराबद्दल श्रेयश जाधव म्हणतो, “ हा पुरस्कार मिळाल्याचा मला निश्चितच आनंद झाला आहे. मात्र माझ्यावरची जबाबदारीही तितकीच वाढली आहे. मराठी सिनेसृष्टीला नावीण्यपूर्ण आशय देण्याचा प्रयत्न मी यापुढेही सुरू ठेवेन. माझ्या या यशामध्ये माझे कुटुंब, सहकारी, मित्रपरिवार या सगळ्यांचा वाटा आहे.”
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.