Pravin Tarde donates ₹11 lakh for the education of farmers’ daughters after visiting Sai Baba temple in Shirdi. saam tv
मनोरंजन बातम्या

मानलं राव! शेतकऱ्यांच्या लेकींच्या मदतीसाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे सरसावले; शिक्षणासाठी 11 लाखांची मदत

Film Director Pravin Tarde: दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी ११ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. आज 'देऊळ बंद २'चित्रपटाची टीम शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आली होती.

Bharat Jadhav

  • प्रवीण तरडे यांनी शेतकऱ्यांच्या लेकींसाठी 11 लाखांची मदत जाहीर केली आहे.

  • ‘देऊळबंद 2’ चे शूटिंग थांबवून मदत निधीची घोषणा केली आहे.

  • ‘देऊळबंद 2’ चित्रपटाची टीम शिर्डी येथे साई बाबांच्या चरणी आली होती.

सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या लेकींसाठी मोठी मदत केलीय. चित्रपटाचं शूटिंग थांबवून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी ११ लाखांची मदत केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देऊळबंद 2 चित्रपटाच्या टीमसह शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. ‘देऊळबंद 2’ या आगामी चित्रपटाचं शूटिंग थांबवून प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली. मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी तब्बल 11 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकींसाठी प्रवीण तरडे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करत त्यांनी असलेल्या समाजाविषयीची आपुलकी दाखवलीय. शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर प्रवीण तरडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.. यावेळी मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी 11 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कुठल्याच मुलीचं शिक्षण बंद पडू देणार नाही. चित्रपटाचं शूटिंगनंतर करू, पण आधी मुलींना शिक्षणासाठी मदत करणार आहोत. शेती विकायची नसते, शेती राखायची असते. आम्ही करत असलेली मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल अशी प्रतिक्रिया तरडे यांनी दिली आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज होणार होता.

मात्र त्यांनी आता चित्रपटाचे शूटिंग थांबवलंय. चित्रपटाचे शूटिंग थांबून सगळे कलाकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरलेत. 'देऊळ बंद 2'च्या टीमकडून 11 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुणे पत्रकार संघ आणि शिवार हेल्पलाइनच्या मदतीने पूरग्रस्त भागात गरजू लोकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहचवली जाणार आहे.

देऊळ बंद सिनेमाच्या पहिल्या भागात अभिनेता गष्मीर महाजनी, मोहन जोशी, निवेदिता सराफ हे कलाकार होते. यामध्ये गष्मीर महाजनी हा वैज्ञानिक होता, जो स्वामींचं मंदिर बंद करतो. मोहन जोशी यांनी या सिनेमात स्वामींची भूमिका साकारली होती. देऊळ बंद 2 मध्येही जास्त भीषण वास्तव असेन. मागच्या भागात देवाला वैज्ञानिक भेटला होता. आता या भागात स्वामींना शेतकरी भेटणार असं प्रवीण तरडे देऊळ बंद 2 ची घोषणा करताना म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नेल एक्स्टेंशन करताना 'या' गोष्टींची अवश्य काळजी घ्यावी

Maharashtra Live News Update: 11 हजार दिव्यांनी लखलखला अंबड येथील मत्स्योदरी देवीचा परिसर,दीपोत्सवासाठी परदेशी पाहुण्याची हजेरी

J J Hospital Mumbai: डॉक्टर महिलेला अपमानास्पद वागणूक; राज्य महिला आयोगाची सर जे जे समूह रुग्णालयावर कारवाई

नाद करा, पण 'बिजल्या'चा कुठं! शेतकऱ्यानं ११ लाखांना बैल विकला; घोड्यालाही घाम फोडणाऱ्या बिजल्याचा खुराक जाणून थक्क व्हाल

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव काय होतं?

SCROLL FOR NEXT