Mahesh Tilekar And Balya Singer Facebook/ @Mahesh Tilekar
मनोरंजन बातम्या

Balya singer : 'आमदाराचे पाय जर बाल्या राहतो, त्या आदिवासी वस्तीकडे वळले तरच...'; टिळेकरांची पोस्ट चर्चेत

आदिवासी गायक बाळ्या सिंगरचे मासेमारी करताना नदी पात्रात बुडून मृत्यू झाला होता. त्याच्या निधनाने दिग्दर्शक महेश टिळेकरांनी फोटो शेअर करत सोशल मीडियावरुन गायक बाळ्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Balya Singer: 'आग पोरी तू स्वप्नात येना' या गाण्यामुळे अल्पवधीतच सोशल मीडियावर फेमस झालेला बाळ्या गायक उर्फ बाळा रतन दिवे या आदिवासी गायकाचा मासेमारी करताना नदी पात्रात बुडून मृत्यू झाला होता. तो जरी आदिवासी गायक असला तरी, त्याच्या गाण्याची चर्चा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत चर्चिली होती.

त्याच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी ही हळहळली आहे. बाळ्याने आापल्या आवाजाची ओळख स्वतः निर्माण केली होती. त्याच्या भेटीला काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक महेश टिळेकर गेले होते. त्यावेळचा एक फोटो शेअर करत त्यांनी सोशल मीडियावरुन सिंगर बाळ्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

त्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये महेश टिळेकर म्हणतात, "बाल्या चटका लावून गेला. आपल्या दमदार आवाजात पारंपरिक आदिवासी गाणी, लोकगीतं गाऊन लोकांचे मनोरंजन करणारा आदिवासी गायक बाल्याची मागे एकदा मी त्याच्या घरी जाऊन भेट घेतली होती . शालेय आणि संगीतातील कोणतंही शिक्षण न घेतलेला बाल्या परमेश्वराने दिलेल्या आवाजात ठेका धरून गाणी गाऊ लागला की ऐकणारा स्तब्ध होऊन जाई.

शहापूर मधील आदिवासी पाड्यातील त्याच्या झोपडीत जाऊन मी त्याची भेट घेतली तेंव्हा साडीच्या झोळीत झोपलेली त्याची तीन महिन्यांची मुलगी दिसली. चुलीवर भात शिजवणारी त्याची बायको आणि तिला बिलगलेला दुसरा एक मुलगा. गरिबाच्या घरात अंधार असताना कुडाच्या भिंतीमधून सूर्यप्रकाशाची एक तिरीप आत येत होती. तोच काय उजेड. मासेमारी करून दारोदार जाऊन ते विकून त्यावर पोट भरणारा बाल्या पावसात खूप हाल होतात ते कळवळून मला सांगत होता.

सरकारने त्यांच्यासाठी पक्की घरे बांधून द्यावी अशी तिथल्या सर्व आदिवासींची मागणी असल्याचं त्याने मला सांगितलं होतं. काल मासे पकडायला गेलेल्या बाल्यावर काळाने घाला घातला. साप चावल्याने बाल्याचा जागीच मृत्यू झाला. बाल्या गेल्याचं दुःख तर आहेच पण त्याची बायको पदरी असलेल्या दोन लहान मुलांसह पुढचं सगळं आयुष्य कसं काढणार ?, ना कुणाचा आधार न कसली सरकारी मदत.

आदिवासी कलेचा प्रसार आपल्या पारंपारिक गाण्यातून करणारा बाल्या गेला म्हणून सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली असं टिपिकल वाक्य बोलून श्रद्धांजली वाहण्यासाठी कुणा नेत्याचे ,स्थानिक आमदाराचे पाय जर बाल्या राहतो त्या आदिवासी वस्ती कडे वळले तरच त्यांना कळेल. वीज, पाणी, रस्ते कुठल्याही सुविधा नसतानाही गरिबीत दिवस काढून लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलाकाराचे आयुष्य किती खडतर आहे. बाल्या भावपूर्ण श्रद्धांजली"

तिथल्या स्थानिक आमदारांनी अथवा नेत्यांनी त्या परिसरातील आणखी एका गोर-गरिब बाल्याचा जिव जाण्याआधी स्थानिक नागरिकांना काय समस्या आहेत. हे जाऊन विचारणे महत्वाचे आहे. वीज, पाणी, रस्ते कुठल्याही सुविधा नसतानाही गरिबीत दिवस काढून लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलाकाराचे आयुष्य किती खडतर आहे. हे तिथे गेल्यावर त्यांना नक्की उमगेल. अशी आशा आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT