Back To School Announcement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Back To School Announcement: पुन्हा घंटा वाजणार.. पब्लिक शाळेत जाणार.. 'बॅक टू स्कूल' सिनेमाची घोषणा

शाळेच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यासाठी सतिश महादु फुगे दिग्दर्शित 'बॅक टू स्कूल' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Chetan Bodke

Back To School Marathi Film Announcement: शाळा... या वास्तुशी आपले सगळ्यांचेच एक भावनिक नाते जुळलेले असते. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते शाळेच्या शेवटच्या दिवसांपर्यंतच्या असंख्य आठवणी मनात कायमच कोरलेल्या असतात मग त्या चांगल्या असो वा कटू. प्रत्येकाची नाळ ही शाळेशी जोडलेली असतेच. शाळेच्या याच अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यासाठी सतिश महादु फुगे घेऊन आले आहेत ' बॅक टू स्कूल'. (Marathi Film)

रंगसंस्कार प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या २२ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे सोबत अनेक कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. शुभांगी सतिश फुगे, सतिश महादु फुगे या चित्रपटाचे निर्माते असून प्राची सतिश फुगे कार्यकारी निर्माती असून छायाचित्रण दिग्दर्शक श्रीनिवास नामदेव गायकवाड आहेत. (marathi actors)

एका पाटीवर दोन खडू ठेवलेले असून त्यावर शाळेचे चित्र रेखाटण्यात आले आहे. शाळेची सफर घडवणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर अतिशय आकर्षक असून ते शाळेच्या भावविश्वात नेणारे आहे. सतिश महादु फुगे आणि अमित नंदकुमार बेंद्रे यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या 'बॅक टू स्कूल' च्या वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे. (Entertainment News)

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सतिश फुगे म्हणतात, “शाळा म्हणजे आपले दुसरे घर. शाळेची गोष्टच निराळी आहे. आईनंतर तीच आपल्याला जगायला शिकवते. अनेक आठवणी शाळा जपते आणि त्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतात. याच आठवणी नव्याने जागवण्यासाठी 'बॅक टू स्कूल' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा असा आहे. प्रत्येकाच्या आयुष्याशी जवळचा असणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्याबरोबरच आम्ही आमच्या नवीन चित्रपटाचीही घोषणा करत आहोत. तोही चित्रपट लवकरच भेटीला येईल.” (Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाढत्या प्रदूषणाचा थेट मेंदूवर हल्ला; मुंबईकरांचा श्वास गुदमरला, काळजी घ्या

शिंदेच घेतायत 500 कोटींचा शोध, जरांगे आणि शिंदेचं नेतृत्व संपवण्याचा डाव-माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

Weather Update: 70 kmच्या वेगानं वाहणार सोसाट्याचा वारा, होणार धुव्वाधार पाऊस; 13 राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

सोन्याच्या किमतीचा 'पारा' घसरणार? सोनं आणखी स्वस्त होणार?

Maharashtra News Live Update: आमदार श्रीजया चव्हाण यांनी घेतली मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट

SCROLL FOR NEXT