Ankush Trailer You Tube
मनोरंजन बातम्या

Ankush Film Trailer Out: धडाकेबाज ॲक्शन असलेल्या ‘अंकुश’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाचा ट्रेलर नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदर्शित

Ankush Trailer News: दमदार स्टारकास्ट, ॲक्शन, रोमान्स आणि मनोरंजनाचा पुरेपूर मसाला असलेल्या ‘अंकुश’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Ankush Marathi Film Trailer Out

दमदार स्टारकास्ट, ॲक्शन, रोमान्स आणि मनोरंजनाचा पुरेपूर मसाला असलेल्या ‘अंकुश’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. आगामी बिगबजेट, ॲक्शनचा दमदार तडका असलेल्या या चित्रपटाटे दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केले आहे. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते नुकताच मुंबईमध्ये प्रदर्शित झाला.

राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या कथानकाला प्रेमकथेची जोड असून ‘अंकुश’ चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. चित्रपटात केतकी माटेगावकर, स्वप्नदीप घुले. सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर, मंगेश देसाई, ऋतुजा बागवे,शशांक शेंडे,गौरव मोरे, नागेश भोसले ,पूजा नायक अशी दमदार स्टारकास्ट आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना, सामान्य कुटुंबातला तरुण, त्याच्या आयुष्यात आलेली तरुणी, कॉलेज जीवनात उमलणारं प्रेम, काहीतरी करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाला समोर आलेला राजकारणाचा डाव अशी मुद्दे ट्रेलरमध्ये ठळकपणे दिसून येत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील हा एक दमदार ॲक्शनपट म्हणून पाहिला जात असून चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अफलातून ॲक्शनचं दर्शन घडत आहे.

ट्रेलरमधील अनेक मुद्द्यांनी प्रेक्षकांचे लक्ष, वेधुन घेतले आहे. गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरचं लोभस रुप पुन्हा एकदा चित्रपटातून पाहायला मिळणार असून वेगवेगळ्या धाटणीची कथा आपल्याला दिसून येत आहे. फुल्ल टू मनोरंजन करणारा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ घुले यांनी ‘अंकुश’ या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांचे आहे. सुप्रसिद्ध संगीतकार अमितराज आणि चिनार- महेश यांचे चित्रपटाला संगीत मिळाले आहे. तर, हिंदी- मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे. मंगेश कांगणे, क्षितिज पटवर्धन, समृद्धी पांडे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, हृषिकेश रानडे, अमितराज , हर्षवर्धन वावरे, राहुल सक्सेना, नकाश अजीज आणि केतकी माटेगांवकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT