Nagraj Manjule Announce Matka King Web Series Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nagraj Manjule Debut OTT: नागराज मंजुळे आता ओटीटी गाजवायला सज्ज; ‘मटका किंग’ वेबसीरीजचे पोस्टर रिलीज

Nagraj Manjule Announced Web Series: नेहमीच विविध आशयघन चित्रपटाच्या माध्यमातून चर्चेत राहणाऱ्या नागराज मंजुळे यांनी नुकतंच नव्या वेबसीरीजची घोषणा केली आहे. नागराज यांनी ‘मटका किंग’ या वेबसीरीजच्या माध्यमातून ओटीटी विश्वामध्ये डेब्यू केले आहे.

Chetan Bodke

Nagraj Manjule Announce Matka King Web Series

नुकतंच ॲमेझॉन प्राईम व्हिडीओकडून या वर्षातील चित्रपटांची आणि वेबसीरीजची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांची आणि वेबसीरीजचा समावेश आहे. ‘मिर्झापूर ३’, ‘पंचायत ३’, ‘द फॅमिली मॅन ३’, ‘स्त्री २’ सह अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट आणि वेबसीरीज या यादीमध्ये आहेत. (Bollywood)

यामध्ये मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या पहिल्या बॉलिवूड वेबसीरीजचीही घोषणा करण्यात आलेली आहे. ‘मटका किंग’ असं या सीरीजचं नाव आहे. अवघ्या काही तासांपूर्वीच वेबसीरीजचा पोस्टर दिग्दर्शकांनी शेअर केला आहे. (OTT)

नेहमीच विविध आशयघन चित्रपटाच्या माध्यमातून चर्चेत राहणाऱ्या नागराज मंजुळे यांनी नुकतंच नव्या वेबसीरीजची घोषणा केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आजवर मराठी सिनेसृष्टीमध्ये उत्तमोत्तम आशय असणारे, हटके कथानक असणारे चित्रपट प्रेक्षकांना त्यांनी दिले आहेत. त्यासोबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘झुंड’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. आता नागराज यांनी ‘मटका किंग’ या वेबसीरीजच्या माध्यमातून ओटीटी विश्वामध्ये डेब्यू केले आहे. (Nagraj Manjule)

‘मटका किंग’ या वेबसीरीजची निर्मिती रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर प्रॉडक्शनकडून निर्मिती करण्यात आली आहे. तर सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे, अश्विनी सिडवानी, आशिष आर्यन हे निर्माते आहेत. तर, अभय कोरणे आणि नागराज मंजुळे यांनी कथानकाचे लेखन केले आहे. तर या वेबसीरीजचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. या वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिकेत, अभिनेता विजय वर्मा दिसणार आहे. अद्याप इतर स्टारकास्टची निर्मात्यांकडून घोषणा करण्यात आलेली नाही. (Web Series)

वेबसीरीजचे कथानक काय ?

या वेबसीरीजची शुटिंग मुंबईमध्ये झाली आहे. मुंबईतला कापसाचा व्यापारी मटका जुगाराचा व्यवसाय कशा पद्धतीने चालवतो ?, तो व्यापारी मटका जुगाराच्या माध्यमातून कशाप्रकारे आपले साम्राज्य उभारतो? हे आपल्याला वेब सीरिजच्या कथेत दिसेल. मटका किंग रतन खत्रीच्या आयुष्यावर आधारित वेब सीरिज आहे. या वेबसीरिजमध्ये मुंबईतील 60-70 दशकातील चित्रण असणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT