Aroh Welankar On Shivsena Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aroh Welankar: “बाळासाहेबही आज खूश असतील.. ” शिंदे गटाचं अभिनंदन करताना मराठी अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला दिले आहे. त्यावर काही मराठी सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Aroh Welankar On Shivsena: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला दिले आहे. त्यामु्ळे आता ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. या निकालानंतर अनेकांनी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर मांडली आहे. त्यातच काही मराठी सेलिब्रिटींनीही त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेल्या आरोहने ही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं त्याने कौतुक केलं आहे. पोस्ट शेअर करत आरोह म्हणतो, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं अभिनंदन... बाळासाहेब पण खुश असतील आज'. त्याच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रियाही यायला सुरुवात झाली आहे.

आरोह नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो बऱ्याचवेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करतो. आजही त्याने केलेलं हे ट्विट चर्चेत आलं आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या सोशय मीडिया पोस्टची नेहमी सर्वत्र चर्चा होत असते. यावेळी ही त्याच्या पोस्टची चर्चा सुरु आहे. राज्याच्या राजकारणात भूकंप आलेला असताना आरोहने केलेल्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आरोह वेलणकरने 'रेगे' या चित्रपटात काम केले असून अनेक चित्रपटांतील भूमिका प्रेक्षकांच्या पसंदीस पडली आहे. नुकतंच तो बिग बॉसच्या चौथ्या पर्वात दिसून आला होता. यामध्ये त्याने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. तो या पर्वाच्या टॉप 5 मध्ये पोहोचला होता. याआधीसुद्धा आरोह वेलणकर बिग बॉस मराठीमध्ये झळकला होता. परंतु शोच्या मध्यातच तो घरातून बाहेर पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

SCROLL FOR NEXT