Shiv Thakare: 'बिग बॉस १६'चा ग्रँड फिनाले नुकताच काही दिवसांपूर्वी पार पडला. 'बिग बॉस १६' च्या विजेत्या पदाची ट्रॉफी Mc स्टॅन घेऊन गेला. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाचा ट्रॉफीसाठी मराठमोळा शिव दावेदार मानला जात होता. रॅपर MC स्टॅन आणि शिव ठाकरे यांच्यात ट्रॉफीसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवला त्याच्या दोन चाहत्यांकडून चिठ्ठी मिळाली आहे. त्या चिठ्ठ्यापाहून पुरता भारावला होता.
शिवने यापूर्वी 'बिग बॉस मराठी २' च्या ट्रॉफीवर आपले नाव कमावले होते. सध्या त्याच्या चाहत्यांची संख्या बरीच मोठी आहे. बिग बॉसमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर शिव अमरावतीला गेला आहे, त्यावेळी त्याचे तिथे धूम धडाक्यात स्वागत करण्यात आले. त्याचवेळी शिवला एक मोठं गिफ्ट मिळालं आहे. शिवला नुकताच एक नाही तर दोन एअरहोस्टेजने चिठ्ठी पाठवली आहे.
एअरहोस्टेजने पाठवलेल्या चिठ्ठ्यांमध्ये लिहिले होते की, “मी तुमचा आदर करते. मला तुमचं कौतुक आहे. तुम्हाला पुन्हा भेटायला मला आवडेल. आई शप्पथ. तुम्हाला खूप सारं प्रेम. माझी आईही तुमची खूप मोठी चाहती आहे” असं त्या चिठ्ठीत लिहिले आहे. सरोज व शिवानी या दोन एअर होस्टेजने मिळून शिवला ही चिठ्ठी दिली आहे.
शिवला मिळालेल्या चिठ्ठीचा फोटो त्याने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. चाहत्यांचं हे प्रेम पाहून तो संपूर्णपणे भारावून गेला आहे. स्टोरी शेअर करत शिवने “किती छान, धन्यवाद” असं कॅप्शनही दिलं. ‘बिग बॉस १६’च्या घरात शिवने एन्ट्री केल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये बरीच वाढ झालेली आहे. आता पर्यंत शिवचे सोशल मीडियावर २ मिलियन फॉलोव्हर्स पूर्ण झाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.