Aatmapamphlet Trailer Shared On Social Media You Tube
मनोरंजन बातम्या

Aatmapamphlet Official Trailer Out: ‘आत्मपॅम्फ्लेट’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित, अतरंगी आणि तिरकस विनोदी प्रेमकथा अनुभवायला मिळणार

Chetan Bodke

Aatmapamphlet Trailer Shared On Social Media

अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये निवड झालेल्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. नुकताच या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात फारच गंमतीशीर असल्याचे दिसत आहे. एका किशोरवयीन मुलाची कथा चित्रपटामध्ये दाखवली आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाची कथा, हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि वाळवी यासारख्या भन्नाट चित्रपटाचे लेखन करणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. त्यामुळे ‘आत्मपॅम्फ्लेट’ मध्येही प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या बर्लिन आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाने स्पर्धात्मक विभागात चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमीयर देखील झाला होता. सोबतच नुकत्याच झालेल्या, आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्स ऑस्ट्रेलियामधे ७० देशांमधल्या चित्रपटांमधून ‘आत्मपॅम्फ्लेट’ला सर्वोत्कृष्ट युथ फिल्मच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे सांगतात, “आत्मचरित्र थोरामोठ्यांचीच असतात, असा सर्वच ठिकाणी नियम आहे. पण सामान्य माणसाचेही आत्मचरित्र असेल असं आपण कुठे पाहिलंय का? हो आहे. तेही भन्नाट असू शकतं ही बाब ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या माध्यमातून करुन दाखवली आहे. किशोरवयीन वयामध्ये एक प्रेमकथा वाटेल पण नक्कीच हा सिनेमा त्याहूनही बरच काही सांगण्याचा प्रयत्न करतो. यातील प्रत्येक पात्र आपल्या आजूबाजूला दिसणारे आहे. प्रत्येकाला ही स्वतःचीच गोष्ट वाटेल. आपल्या आवडत्या काळाचा नॉस्टॅलजिया देणारा आणि प्रत्येक वयोगटासाठीचा हा चित्रपट असेल.”

चित्रपटामध्ये मुख्य भूमिका ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांनी साकारली आहे. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित चित्रपटाचे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या नावातच काही तरी भन्नाट असल्याचं वाटत आहे. (Films)

आता नेमकं चित्रपटा आपल्याला नावाप्रमाणे काय भन्नाटपणा पाहायला मिळणार हे येत्या ६ ऑक्टोबरलाच कळेल. चित्रपटाने प्रदर्शना आधी बर्लिन आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्स प्रमाणेच बऱ्याच पुरस्कार सोहळ्यांमधून आपली छाप निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने आपली छाप पाडली. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT