Shah Rukh Khan Stylish Look:
बॉलिवूडचा (Bollywood) 'बादशाह' अर्थात अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) सध्या त्याच्या 'जवान' चित्रपटामुळे (Jawan Movie) चर्चेत आहे. शाहरुख 'जवान'च्या यशाचा आनंद घेत आहे. प्रदर्शित होण्याच्या पहिल्याच दिवशी जवानने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. सध्या जवान बॉक्स ऑफिसवर सुसाट चालला आहे. 'जवान'ने अवघ्या ९ दिवसांत ४०० कोटींचा कमाईचा टप्पा पार केला.
एकीकडे जवानमधील शाहरुखच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे शाहरूख खानच्या नव्या हेअरस्टाइलमुळे (Shah Rukh Khan News Look) तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचा हा स्टायलिश लूक पाहून 'जवान'नंतर शाहरुख खान 'डॉन ३' या चित्रपटाच्या (Don 3 Movie) शूटिंगमध्ये बिझी होणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शुक्रवारी रात्री 'जवान'च्या यशाबद्दल चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठ्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी संपूर्ण जवानची स्टारकास्टने हजेरी लावली. या पत्रकार परिषदेत शाहरुख खानचा नवा लूक सर्वांना पाहायला मिळाला. आतापर्यंत शाहरुख नॉर्मल हेअर कट करताना दिसला आहे. पण यावेळी किंग खानने लांब केसमध्ये जबरदस्त हेअरस्टाईल केली होती. शाहरुख खानने यावेळी ब्लॅक अँड व्हाईट कोट आणि पँट परिधान केली होती. तर हेअर स्टाईल कमालच होती. त्याच्या या क्लासी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शाहरुख खान पहिल्यांदाच असा स्टायलिश आणि क्लासी लूकमध्ये दिसला. त्यांची पत्रकार परिषदेत एन्ट्री होताच सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच होत्या. शाहरुख खानची हेअर स्टाईल त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. त्याचे या नव्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंना नेटिझन्सनी चांगली पसंती दिली आहे. या फोटोंना खूप सारे लाइक्स मिळत आहेत.
शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने हे फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधील किंग खानचा हा जबरदस्त लूक पाहून चाहते गोंधळून गेले आहेत. शाहरुख आता 'डॉन ३' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल असा अंदाज अनेकांनी बांधला आहे. एका यूजरने कमेंट्समध्ये लिहिले की, 'डॉन लूक.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'डॉन ३ करण्याचा तुमचा इरादा आहे का?' एका चाहत्याने तर 'बघ डॉन आला आहे' असे लिहिले आहे. नुकताच फरहान अख्तरने 'डॉन ३' चित्रपटाची घोषणा केली. यावेळी या चित्रपटामध्ये शाहरुख खान दिसणार नाही. या चित्रपटात रणवीर सिंगची एन्ट्री झाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.