Phone Bhoot Trailer Out  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Phone Bhoot Trailer Out: 'फोन भूत' चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर पाहून हसून हसून लोटपोट व्हाल

गुरमीत सिंह दिग्दर्शित 'फोन भूत'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात हॉरर कॉमेडी दिसून येत आहे. चित्रपटात कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीही मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गुरमीत सिंह दिग्दर्शित 'फोन भूत' (Bollywood) चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात हॉरर कॉमेडी दिसून येत आहे. चित्रपटात कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीही मुख्य भूमिकेत दिसून (Bollywood Actor) (Bollywood Actors) येत आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच हे तीनही कलाकार एकत्र दिसून येत आहेत. चित्रपटात हॉरर कॉमेडी आणि सस्पेन्स दाखवण्यात आला आहे. हे तिघेही चित्रपटांत भूताचा सामना करताना दिसत आहेत. भूताचा शोध घेण्याचे काम त्यांच्यावर सोपवले आहे. (Marathi Entertainment News)

ट्रेलर पाहताच प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडत आहेत. विकी- कतरिनाच्या लग्नानंतर चित्रपटांमध्ये परत कमबॅक करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये सुरुवातीला काही भयानक दृश्ये दिसतात. त्यामुळे काहीवेळ भीती असते. सिद्धांत आणि ईशानच्या एन्ट्रीने थोडे हसू येते. त्या दोघांनाही एक अशी पॉवर मिळते त्या पॉवरचा वापर करत ते भूतांना बघू शकतात. कतरिना कपूर चित्रपटात भूताच्या भूमिकेत दिसत आहेत.

Edit By: Chetan Bodke

तिघेही एकत्र येत आत्म्यांना मोक्ष देण्याचे काम करत असतात. जॅकी श्रॉफ देखील ट्रेलरमध्ये दिसत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंहने केले असून चित्रपटाची कथा रवी शंकरन आणि जसविंदर सिंहने लिहिले आहे. चित्रपटाचे सादरकर्ते एक्सेल एन्टरटेन्मेंट असून चित्रपटाचे निर्माते रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर आहे. कतरिना, सिद्धांत, ईशान सोबत चित्रपटात जॅकी श्रॉफ, शिबा चड्डा, निधी बिष्ट हे कलाकारही आहेत. चित्रपट येत्या ४ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kajal Aggarwal : काजल अग्रवालच्या मृत्यूची अफवा, नेमकं काय आहे सत्य?

Zilha Parishad School : बंद पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट; शिक्षक दाम्पत्याच्या योगदानाला लोकसहभागाची साथ

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

SCROLL FOR NEXT