Umesh-Priya SAAM TV
मनोरंजन बातम्या

Umesh-Priya : लपवा-लपवीचे दिवस अन् पेपरात फोटो; उमेशने सांगितला रिलेशनशिपचा हटके किस्सा!

Umesh Kamat Share Funny Moment : 'झी मराठी पुरस्कार' सोहळ्याला उमेश कामतने त्याचा आणि प्रिया बापटचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. जो ऐकून सर्वजण हसू लागतात.

Shreya Maskar

मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat ) आणि अभिनेत्री प्रिया बापट ( Priya Bapat) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी 'झी मराठी पुरस्कार' सोहळ्याला आपली हजेरी लावली होती. यावेळी उमेशने एक भन्नाट किस्सा सांगितला. हा किस्सा उमेश आणि प्रिया एकमेकांना डेट करत होते त्यावेळचा आहे.

उमेश किस्सा सांगताना म्हणाला की, "मी आणि प्रिया एकदा वांद्रे रेक्लेमेशनला बसलो होतो. आम्ही बाईक लावून कट्ट्यावर बसलो होतो. तेव्हा आमच्या रिलेशनशिपमध्ये लपवा-लपवीचे दिवस चालू होते. मला दुसऱ्या दिवशी प्रियाचा फोन आला की, अरे उमेश एका वृत्तपत्रात आपला फोटो आला आहे. रेक्लेमेशनच्या कट्ट्याचा फोटो आहे तो." पुढे उमेश बोलतो की, "बरं त्यावेळी वृत्तपत्रात झूम वगैरे करून पाहायची सोय नव्हती त्यामुळे चांगल झालं. त्यावेळी आम्ही दोन दिवस एकमेकांची समजूत काढली होती. आम्हाला वाटलं की आता आपलं भांड फुटणार आणि घरच्यांना कळणार"

उमेश अनेक मुलाखतीत आपल्या लव्हस्टोरीचे किस्से सांगत असतो.मात्र हा नवाकोरा २५ वर्षांपूर्वीचा किस्सा त्यांनी 'झी मराठी पुरस्कार' मंचावर सांगितला. उमेशला फोन करताना प्रिया प्रचंड घाबरलेली होती. मात्र प्रियाने सांगितले की, "त्यांनी आमचा मुद्दाम हा फोटो काढला नव्हता, हे पावसाळ्याचे दिवस होते." उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी 2011 लग्नगाठ बांधली. लग्नाआधी ते काही काळ एकमेकांना डेट करत होते.

पुढे प्रियाने सांगितले की, "माझ्या मैत्रिणीच्या मावशीने मला ओळखले होते. तिने माझ्या मैत्रिणीला विचारले की, ही प्रिया आहे ना? हे मला मैत्रिणीने फोनवर सांगितले. तेव्ही मी घरी पेपरमधले ते फोटोचे पानच कापून टाकलं होतं" उमेश आणि प्रियाचा हा मजेशीर किस्सा ऐकून सर्वजण हसू लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT