All The Best Drama Saam Tv
मनोरंजन बातम्या

All The Best: मुका, बहिरा, आंधळ्या मित्रांची धमाल कॉमेडी; १५ वर्षांनी पुन्हा 'ऑल द बेस्ट' नाटक येतंय नाट्यप्रेमींच्या भेटीला

Priya More

All The Best Drama:

मराठी नाट्यप्रेमींसाठी (Theather Lover) आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांच्या मनोरंजनासाठी नवंकोरं नाटक येत आहे. ९०च्या दशकामध्ये गाजलेलं ‘ऑल द बेस्ट’ नाटक (All The Best Drama) आता नव्याने नाट्यप्रेमीसांठी येत आहे. ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक येत्या २ फेब्रुवारीपासून रंगभूमीवर सज्ज होणार आहे. मुका, बहिरा, आंधळ्या मित्रांची धमाल कॉमेडी घेऊन १५ वर्षांनी पुन्हा 'ऑल द बेस्ट' नाटकातून रंगभूमीवर हास्यकल्लोळ होणार आहे. आता नवोदित कलाकारांचा संच रंगभूमीवर खणखणीत वाजलेलं ‘ऑल द बेस्ट’ नाटक गाजवणार आहे.

मराठी रंगभूमीवर खणखणीत वाजलेलं आणि गाजलेलं नाटक म्हणजे देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’. देवेंद्र पेम लिखित ही एकांकिका ९०च्या दशकाच्या सुरुवातीला विशेष गाजली. ३१ डिसेंबर १९९३ ला या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला. ३० वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि रंगभुमीवर मोठा इतिहास घडवला. या नाटकाने शेकडो तगडे स्टार इंडस्ट्रीला दिलेच पण भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर हे सूपरस्टार देखील दिले.

श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, जितेंद्र जोशी, दीपा परब, सुहास परांजपे, राजेश देशपांडे, संतोष मयेकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी या नाटकातून आपल्या करिअरची सुरुवात केली. मुका, बहिरा आणि आंधळा अशा मित्रांची कथा असलेलं हे धमाल नाटक रसिकांनी न भूतो अस उचलून धरलं. नाटकाच्या प्रयोगांचा ओघ ऐवढा होता की एकाच वेळी तीन टिम्स 'ऑल द बेस्ट'चे प्रयोग करत होते. दर महिन्याला या नाटकाचे ६० ते ७० प्रयोग व्हायचे. नाटकाच्या पहिल्या पाच वर्षांत तब्बल २१०० प्रयोग झाले.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल देशपांडे यांनी या नाटकाची तारीफ करत देवेंद्र पेम यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. 'ऑल द बेस्ट'ने केवळ मराठीचं नाही तर विविध भाषीक प्रेक्षकांनाही अक्षरशः वेड लावलं. त्यामुळे हे नाटक आजवर १२ भाषांमध्ये प्रदर्शित झालं असून त्याचे जवळ जवळ १०,००० प्रयोग झाले. या नाटकाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. ती लक्षात घेऊन हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला सज्ज होणार आहे.

नव्या दमाच्या मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील आणि रिचा अग्निहोत्री या कलाकारांनी नाटकाची जोरदार तालीम सुरु केली आहे. 'अनामय' नाट्यसंस्थेची निर्मिती असणाऱ्या या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग २ फेब्रुवारीपासून रंगणार आहे. नव्या नाटकातील तरुण कलाकारही या गाजलेल्या नाटकासाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहेत. या नव्या संचातून जुन्या रसिक प्रेक्षकांसह नव्या प्रेक्षकवर्गालाही आनंद मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT