२१ भारतीय चित्रपट, तंत्रज्ञ आणि देशोदेशीचे निर्माते, चित्रपट यांच्यात व्यवसायाच्या दृष्टीने संवाद घडवून आणणाऱ्या इफ्फी फिल्म बाजारमध्ये गेली दहा वर्ष सातत्याने दादासाहेब फाळके चित्रनगरीने सहभाग घेतला आहे. यंदा गोवा येथे सुरू असलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वेव्हज फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सहभाग घेतला असून येथे श्री गणेशा आणि मुक्काम पोस्ट देवाच घर या दोन चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले.
मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे या करिता महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी घेतला जातो. गोव्यात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सहभागाचे हे अकरावे वर्ष आहे.
यंदाच्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील वेव्हज फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमात दोन मराठी चित्रपट 'श्री गणेशा' आणि 'मुक्काम पोस्ट देवाच घर' यांचे प्रदर्शन करण्यात आले.
मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकार विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभाग घेत आहे. गोव्यातील या महोत्सवातील सहभागाचे हे सलग अकरावे वर्ष असून या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत आहे.
यंदा संकेत माने दिग्दर्शित 'मुक्काम पोस्ट देवाच घर' आणि मिलिंद कवडे दिग्दर्शित 'श्री गणेशा' या चित्रपटांचे फिल्म बाजारमध्ये प्रदर्शन झाले. महोत्सवाच्या काळात रसिकांना नावनोंदणी करून हे चित्रपट पाहण्याची संधी देण्यात आली आहे. याचबरोबर २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे महामंडळाने सांगितले. तसेच या वर्षीचा चित्रनगरीचा स्टॉल आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. स्टेट पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचा स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आला असून येथे महाराष्ट्र शासनाच्या विविध चित्रपट योजनांची माहिती दिली जात आहे. याचबरोबर दादासाहेब फाळके चित्रनगरीचे उपक्रम आणि एनडी स्टुडिओची माहितीही स्टॉलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.