Seema Deo Funeral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Seema Deo: सीमा देव यांच्या अंत्यदर्शनाला मराठी कलाकारांसह बॉलिवूडकरांनी फिरवली पाठ...

Seema Deo News: दरम्यान, सीमा देव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मराठी कलाकारांसह बॉलिवूडकरांनी पाठ फिरवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Seema Deo Funeral

संजय गडदे, मुंबई

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. सीमा देव यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनानं मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे. सीमा देव यांचे निधन अल्झायमर या आजारामुळे झाला आहे. ते या आजारामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त होते. दरम्यान, सीमा देव यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. पण त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मराठी कलाकारांसह बॉलिवूडकरांनी पाठ फिरवली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्यावर आज दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याआधी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव मुंबईच्या वांद्रे पश्चिमेतील त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडमधून फक्त जावेद जाफरी, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक राजदत्त, संगीतकार अजय आणि अभिनेत्री पूजा पवार, अभिनेत्री नेहा पेंडसे यांनीच पार्थिवाचं दर्शन घेतलं. मराठी सिनेमासृष्टीतून आणि बॉलिवूडमधल्या एकाही बड्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने सीमा देव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले नाही.

सुंदर चेहरा, मनमिळावू स्वभाव, गोड हास्य आणि दर्जेदार अभिनयामुळे सीमा यांचा चाहतावर्ग बराच मोठा होता. रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहण्या सारखीच आहे. २०२२ मध्ये ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले होते. त्यामुळे मराठीच नाही तर बॉलिवूड सिनसृष्टीलाही मोठा धक्का बसला होता. त्यापाठोपाठ आता रमेश देव यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला.

सीमा देव यांना 2020 पासून स्मृतिभ्रंश या आजाराने ग्रासले होते. वयोमानामुळे त्यांना इतरही काही त्रास होत होता या संदर्भात त्यांचे पुत्र अभिनेता अजिंक्य देव यांनी ट्विट करून त्यावेळी माहिती देखील दिली होती. आईसाठी प्रार्थना करा असेही त्याने त्या ट्विटमध्ये म्हटले होते मात्र आज सकाळी सीमा देव यांचे निधन झाले.

Edited By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT