
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. सीमा देव यांचे निधन अल्झायमर या आजारामुळे झाला आहे. ते या आजारामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त होते. त्यांच्या निधनानं मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे.
रियल लाईफमध्येच नाही तर, रिल लाईफमध्ये एकमेकांचे जोडीदार असलेल्या रमेश देव आणि सीमा देव यांच्या लव्हस्टोरीची सिनेसृष्टीत नेहमीच चर्चा होते. १ जुलै १९६३ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाच्या ५२ व्या वाढदिवसाला रमेश देव यांनी सीमा देव यांना दिलेलं गिफ्ट सीमा यांनी ते जीवापाड जपलं होतं.
लग्नाच्या ५२ व्या वाढदिवसाला रमेश यांनी सीमा यांना डायमंडच्या बांगड्या गिफ्ट केल्या होत्या. त्यावेळी सीमा देव मुलाखतीत म्हणाल्या होत्या, “लग्नाच्या ५२व्या वाढदिवशी मला ते मुंबईतल्या एका ज्वेलर्सच्या दुकानात घेऊन गेले होते. कायमच रमेश देव यांना शॉपिंग करायला आवडते. पण मला जास्त महागडे गिफ्ट्स आवडत नाही. पण ते मला अनेकदा इमोशनल ब्लॅकमेल करत ‘मी तुझ्याजवळ उद्या असेल नसेल, त्यामुळे मला तुझ्यासाठी हे आता खरेदी करू दे’ असं म्हणत ते माझ्यासाठी गोष्ट खरेदी करायचे.”
सोबतच पुढे सीमा यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची सुद्धा आठवण शेअर केली होती. सीमा देव यांना रमेश देव यांनी त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला डायमंडचे कानातले गिफ्ट दिले होते. ते कानातले मागील ५२ वर्षांपासून मी दररोज घालत असल्याचं सीमा देव म्हणाल्या होत्या.
दरम्यान, १ जुलै २०१३ रोजी रमेश देव यांनी सीमा देव यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विधिवत रित्या लग्नगाठ बांधली होती. लग्न सोहळ्याला अनेक कलाकार, नेतेमंडळीही उपस्थित होते. रमेश आणि सीमा देव यांच्या लग्नाच्या ५०व्या वाढदिवसाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उपस्थिती लावली होती. सोबत हेमा मालिनी, अनिल कपूरदेखील लग्नसोहळ्याला उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.