Marathi Bigg Boss Saam Tv
मनोरंजन बातम्या

Big Boss Season 4: बिग बॉसच्या चौथ्या पर्वात हॉटनेसचा तडका; व्हिडिओ पाहून चर्चेला उधाण !

कलर्स वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या टिझरमध्ये दोन तरुण कलाकार आपल्या दिलखेचक अदांनी थिरकताना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अनेक कलाकार मंडळी बिग बॉसच्या (Big Boss Season 4) घरातून आपल्या अभिनयाची सुरुवात करतात. काहींना चांगली ओळख प्राप्त होते तर काहींना इतकी खास ओळख प्राप्त होत नाही. प्रेक्षकवर्ग जितकी मालिका आवडीने बघतात तितक्याच आवडीने बिग बॉसला ही पसंती देतात. प्रेक्षकवर्ग जेवढा हिंदी बिग बॉससाठी (Bollywood) आतूर असतो, तितकाच प्रेक्षकवर्ग हा मराठी बिग बॉसला ही आतूर असतो. आत्ता पर्यंत मराठीमध्ये बिग बॉसचे तीन सीजन पार पडले. जितका तीन सीजनला भरभरून प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद किंबहूना त्याहून अधिक प्रतिसाद चौथ्या सीजनला मिळण्याची शक्यता आहे. (Marathi Entertainment News)

बिग बॉसचा चौथा सीजन येत्या 2 ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चौथ्या सीजनमध्ये कोण कोण कलाकार भाग घेणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. कलर्स वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक टिझर शेअर करण्यात आला आहे. या टिझरमध्ये दोन कलाकार आपल्या दिलखेचक अदांनी थिरकताना दिसत आहे. 'मोहे रंग लगा दे रे' या गाण्यावर एक तरुण व तरुणी कलाकार डान्स करताना दिसत आहे. डान्स मध्ये दोघांचाही चेहेरा दाखवण्यात आलेला नाही.

प्रेक्षकांना कोणतीच हिंट न देत कोणता स्पर्धक आहे असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. त्यामुळे चाहते बरेच आपले तर्कवितर्क लावत आहेत. अनेक नेटकरी व्हिडिओत हिना खान असल्याचे बोलत आहे. आधीच्या तीनही पर्वाप्रमाणे याही पर्वात महेश मांजरेकरच सुत्रसंचालनाची जबाबदारी पेलत आहे. गेल्या सीझनमध्ये स्पर्धकांना १५ दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावे लागले होते, पण स्पर्धकांना या पर्वात क्वारंटाईन व्हावे लागणार नसल्याची माहिती एका संकेतस्थळाने दिली आहे.

बिग बॉसच्या चौथ्या पर्वात मिळालेल्या माहितीप्रमाणे हार्दिक जोशी, सायली संजीव, स्नेहा चव्हाण, अनिकेत विश्वासराव, सोनाली पाटील, रसिका सुनिल, विकास पाटील, नेहा जोशी, शिवलीला पाटील, तृप्ती, उत्कर्ष, विशाल निकम, सई रानडी, गायत्री दातार, ऋषी सक्सेना, किरण माने हे कलाकार कदाचित सहभागी होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friendship songs: तुमच्या मित्रासाठी या फ्रेंडशिप डेला डेडिकेट करा ही हटके गाणी

Pandharpur News : पंढरपूरमध्ये बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाचा छापा; ११ लाखांचा साठा जप्त

Moto G86 Power 5G: दमदार बॅटरी आणि कॅमेरासह हा फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढल्याने बैलगाडा शर्यतीवर बंदी...

महिला कॉन्स्टेबलला शिपाई नवऱ्यानंच संपवलं, शेतात नेत डोक्यात घातला रॉड; कारण..

SCROLL FOR NEXT