मुंबई : अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट दृश्यम अनेकांनी पाहिला असेल. ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट बघितला असेल त्यांच्या मनात हा प्रश्न नक्कीच असेल की, 2 आणि 3 ऑक्टोबरला स्वामी चिन्मयानंद यांच्या महासत्संगमध्ये काय घडले. आता याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. कारण अजय देवगण (Ajay Devgan) आपल्या परिवारासह पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. अजय देवगण याच्या दृश्यम 2 या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
दृश्यम 2 (Drishyam 2) चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर तुमच्या मनात कुतूहल नक्कीच निर्माण होईल. जुन्या आणि नवीन चित्रपटातील काही सीन्स वापरून टीझर बनवण्यात आला आहे. दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा नक्कीच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. एका आईला तिचा बेपत्ता झालेला मुलगा सापडेल का की, विजयला त्याच्या गुन्हांची कबुली द्यावी लागेल. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळतील. सोशल मीडियावर लोकांनी टीझरला पसंती दर्शवली आहे.
दृश्यम या चित्रपटाची कथा विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबावर आधारित आहे. विजयच्या मुलीला एक मुलगा ब्लॅकमेल करत असतो. तिच्या हातून नकळत त्या मुलाचा खून होतो. संपूर्ण कुटुंब घाबरलेले असते. त्या सगळ्यांना वाचवण्यासाठी विजय सगळे पुरावे नष्ट करतो आणि आपल्या कुटुंबासह पणजीला फिरायला जातो. पहिल्या भागात विजय आपल्या कुटुंबाला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यात यशस्वी होतो. दुसऱ्या भागात विजयला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल. कोणती रहस्य या भागात उलघडतील, यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तब्बू या चित्रपटात पोलीस अधिकारी आहे. मीरा देशमुख हे पात्र ती साकारत आहे. अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
दृश्यम हा मल्याळम चित्रपट दृश्यमचाच रिमेक आहे. निशिकांत कामत यांनी याचे दिग्दर्शन केले होते. दृश्यम २ मल्याळममध्ये रिलीज झाला आहे. मल्याळममध्ये प्रदर्शित झालेला हा दुसरा भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतराला होता. त्यामुळे हिंदीमध्ये प्रदर्शित होणार दृश्यम 2 कसा असेल याची सर्वांना उत्सुकता आहे. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांचं लक्ष आता ट्रेलरमध्ये काय उलघडणार याकडे आहे. यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. कारण दृश्यम 2 नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.