Collaboration canva
मनोरंजन बातम्या

मराठी आणि साऊथचं दमदार Collaboration; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’चा टीझर पाहाच

Marathi and South Industry Collaboration : मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा मराठी आणि साऊथचं दमदार कोलॅबरेशन पहायला मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी आणि साऊथचं दमदारकाही महिन्यांपूर्वी 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या मराठी सिनेमाचा पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पोस्टरमुळे चाहत्यांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या चित्रपटाचा लूक अनेक मराठी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. चित्रपट कधी प्रदर्शित होणार? विशेष म्हणजे, मराठी आणि कन्नडा सिनेमाचं कोलॅबोरेशन म्हणजे 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' हा सिनेमा.

दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल, आणि रमेश कोठारी यांनी 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाला टीझर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटामधील सिन्स आणि कलाकारांच्या अभिनयामुळे आणि प्रभावी बॅकग्राऊंड म्युझिकमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.

‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या चित्रपटाचे निर्माते दिपक पांडुरंग राणे यांनी विविध जॉनरमधील चित्रपटांची निर्मिती करुन प्रेक्षकांचं मनेरंजन केलं आहे. त्यांचा नेहमीच असा उद्देश असतो की प्रेक्षकांनी अडीच ते तीन तास सिनेमागृहात येऊन स्वतःसाठी वेळ काढावा, रिलॅक्स व्हावे आणि मनोरंजनाचा आनंद घ्यावा त्यामुळे निर्मात्यांनी अशा सिनेमांची निवड केली आहे. दिपक पांडुरंग राणे यांनी नवं पाऊल टाकत एक नवीन विषय हाताळले आहे.

दिपक पांडुरंग राणे यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी एक असा सिनेमा तयार केला आहे, जो कन्नडा सिनेमासोबत कोलॅबोरेट करून बनवला गेला आहे. ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा चित्रपट कन्नडा, मराठी, हिंदी, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम या ६ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमात मराठीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार शिवानी सुर्वे, विराट मडके, प्रसाद खांडेकर, अश्विनी चावरे, शलाका पवार यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार कवीश शेट्टी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा शेट्टी देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Chinki - Minki प्रसिध्द युट्यूबर चिंकी मिंकीची जोडी अखेर तुटली!

Ulhasnagar Crime News : दारू पिताना मित्रांमध्ये बिनसले; वाद टोकाला गेल्याने मित्रालाच संपविले

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT