Nagraj Manjule Announced New Movie Instagram
मनोरंजन बातम्या

Kasturi Movie: नागराज मंजुळेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा; स्वच्छता कर्मचाऱ्यांना देणार खास ट्रिब्युट

Chetan Bodke

कस्तुरी चित्रपट

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या कामातून फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे. नागराज मंजुळे कायमच दमदार विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गेल्या काही काही दिवसांपूर्वी ‘घर बंदूक बिरयानी’ सारख्या चित्रपटामुळे नागराज मंजुळे चर्चेत होते. अशातच त्यांनी, २ ऑक्टोबरला स्वच्छ्ता दिनाचे औचित्य साधत आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी पोस्ट करत ‘कस्तुरी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

नागराज मंजुळे यांनी प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकासोबत आगामी चित्रपटाची घोषणा केली. नागराज यांच्या आगामी चित्रपटामध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप प्रेझेंटर म्हणून चित्रपटामध्ये काम पाहणार आहेत. नागराज यांनी इन्स्टावर पोस्ट शेअर करुन त्याविषयी ‘कस्तुरी’ चित्रपटाबद्दलची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये नागराज मंजुळे यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, चित्रपटाची स्टारकास्ट याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, काल अवघ्या देशभरात सर्वांनीच स्वच्छता दिवस साजरा केला. आपला आजुबाजुचा परिसर, समुद्र किनारे, रेल्वे स्थानक इ. अशा ठिकाणी स्वच्छता अभियान केली. स्वच्छतेसाठी आपल्या आयुष्याची फार मोठी किंमत चुकवली आहे, त्यांना हा चित्रपट समर्पित केला आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या कामाबद्दल सांगायचे तर, ‘घर बंदुक बिरयानी’च्या दमदार यशानंतर दिग्दर्शक आणि निर्माते नागराज मंजुळे यांनी दोन आगामी चित्रपटाची घोषणा केली. ‘खाशाबा’ आणि त्यानंतर ‘कस्तुरी’. त्याआधी नागराजयांनी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘नाळ’ सारख्या उत्तमोत्तम आशयघन चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. कायमच नागराज मंजुळेंच्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT