tejaswini pandit saam tv
मनोरंजन बातम्या

Tejaswini Pandit: 'त्या नगरसेवकाने घरभाड्याच्या बदल्यात मला...' अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केला धक्कादायक खुलासा

तेजस्विनी पंडितने पुण्यातील नगरसेवकाने तिला घाणेरडी मागणी केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tejaswini Pandit: बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी असो या क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्रींना अनेकदा वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. मध्यंतरी हिंदी सिने जगतात मी टू मोहिमेची जोरदार चर्चा झाली होती. यावेळी अनेक अभिनेत्रींनी त्यांंना आलेले वाईट अनुभव सांगितले होते. अलिकडेच एका मुलाखतीत बोलताना असाच धक्कादायक खुलासा मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही केला आहे.

तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुण्यातील नगरसेवकाने तिला घाणेरडी मागणी केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

अभिनेत्री तेजस्वी पंडितची अथांग सिरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सिरीजवेळी दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना तेजस्वी पंडितने “२००९-१० मध्ये मी पुण्यातील सिंहगट रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होते. ते घर एका नगरसेवकाच्या मालकीचे होते. एके दिवशी मी घराचे भाडे देण्यासाठी नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये गेले, तेव्हा त्याने माझ्याकडे घरभाड्याच्या बदल्यात घाणेरडी मागणी केली” असा खुलासा केला.

नगरसेवकाच्या या मागणीनंतर मी त्याच्या टेबलवरील ग्लासमधील पाणी त्याच्या तोंडावर फेकले आणि "अशा मार्गाचा अवलंब करायचा असता तर भाड्याच्या घरात राहिले नसते, माझ्याकडे स्वतःचे घर असते, दारात गाड्या असत्या," अशा शब्दात त्याला खडेबोल सुणावले असाही खुलासा अभिनेत्रीने केला.

या अनुभवाबद्दल बोलताना तेजस्विनीने त्याने माझे काम पाहिले होते. त्यामुळे माझ्याविषयी स्वत:चे मत तयार केले. दुसरीगोष्ट आर्थिकदृष्ट्या मी कमकुवत होते. पण या गोष्टींमुळे मी अनेक गोष्टी शिकले, असेही सांगितले.

दरम्यान, अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी ओळखली जाते. तिने 'तु हिरे', 'मी सिंधुताई सपकाळ' अशा चित्रपटांमध्ये तर 'समांतर' या वेबसिरीजमध्येही काम केले आहे. अलिकडेच तिची 'रानबाजार' वेबसिरीज प्रचंड गाजली होती. ज्यामधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? राजकीय घडामोडींना वेग

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT