Suruchi Adarkar Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suruchi Adarkar Wedding: सुरुची अडारकर अडकली विवाहबंधनात, या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केलं लग्न?

Suruchi Adarkar And Piyush Ranade Wedding: 'का रे दुरावा फेम' अभिनेत्री सुरुची अडारकरने (Suruchi Adarkar) अभिनेता पियुष रानडेसोबत (Piyush Ranade) गुपचूप लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya More

Suruchi Adarkar Marriage:

मराठी मनोरंजनसृष्टीत एकापोठपाठ एक सेलिब्रिटी प्रेमाची कबुली देत विवाहबंधनात अडकत आहेत. नुकताच अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) प्रेमाची कबुली देत बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला होता. तर अभिनेत्री अमृता देशमुखने (Amruta Deshmukh) अभिनेता प्रसाद जवादेसोबत (Prasad Jawade) लग्न केले. त्यानंतर आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. 'का रे दुरावा फेम' अभिनेत्री सुरुची अडारकरने (Suruchi Adarkar) अभिनेता पियुष रानडेसोबत (Piyush Ranade) गुपचूप लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी लग्न केल्याचे कळताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पियुष आणि सुरुची यांनी 'अंजली' या मालिकेमध्ये एकत्र काम केले होते. पण हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत हे देखील कोणाला माहिती नव्हते. कधीच दोघांनी सोशल मीडियावर एकत्र फोटो पोस्ट केले नाहीत किंवा एकमेकांप्रती प्रेम व्यक्त केले नाही. त्यामुळे त्यांनी लग्न केल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

सुरुची अडारकर आणि पियुष रानडे या दोघांनी देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. सुरुचीने लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'आनंदाचा दिवस' असे कॅप्शन दिले आहे. तसंच तिने हॅशटॅग पीएसआयलव्ह असे लिहिले आहे. सुरुचीच्या या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी दोघांवर देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सुरुचीने लग्नामध्ये पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तर पियूषने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि सुरुचीच्या साडीच्या रंगाची म्हणजेच पिवळ्या रंगाचा दुपट्टा घेतला आहे. या फोटोंमध्ये हे कपल खूपच सुंदर दिसत आहे. सुरूचीचा नवरा पियुष रानडे हा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. पियुष सध्या 'काव्यांजली' या मालिकेत काम करत आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, पियुष रानडेचे हे तिसरे लग्न आहे. पियुष रानडेचे अभिनेत्री शाल्मली टोळ्येसोबत पहिले लग्न झाले होते. पण काही वर्षांमध्येच त्यांचा घटस्फोट झाला. दोघांनी 'दुर्वा' मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर पियुष रानडेने अभिनेत्री मयुरी वाघसोबत दुसरं लग्न केले होते. पण त्यांचा देखील वर्षात घटस्फोट झाला. आता पियूषने सुरुची अडारकरसोबत लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT