Sab Moh Maaya Hai Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sab Moh Maaya Hai Trailer: स्पृहा जोशीचे चाहत्यांना खास सरप्राइज; ‘या’ फेमस अभिनेत्यासोबत हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

Spruha Joshi Bollywood Film Trailer Released: नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी स्पृहा जोशी सध्या आगामी बॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Sab Moh Maaya Hai Trailer Released

नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी स्पृहा जोशी सध्या आगामी बॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांतून आणि मालिकेतून चाहत्यांचे निखळ मनोरंजन केल्यानंतर अभिनेत्री लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सब मोह माया है’ या चित्रपटातून स्पृहा बॉलिवू़ड चित्रपटामध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत मुख्य भूमिकेत शर्मन जोशीही दिसणार आहे. एक गंभीर विषय हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. (Bollywood)

अभिनेत्रीने ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करताना स्पृहाने “बाप के बदले नौकरी, नौकरी के बदले बाप? कितना भारी पडेगा ये सौदा फॉर मिश्रा परिवार”, असं कॅप्शन लिहीत तिने नव्या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. (Bollywood Film)

शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये, सरकारी नोकरीसाठी काय काय खोटे नाटक करतात, हे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. स्पृहाने चित्रपटामध्ये शर्मन जोशीच्या पत्नीचे पात्र साकारले. शिवाय ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी शर्मनच्या वडिलांचे पात्र साकरले आहे. हा चित्रपट १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. (Actress)

गंभीर विषय असलेल्या चित्रपटाची कथा लेखकांनी अगदीच हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलर शेअर करताच स्पृहावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्पृहाचे चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. स्पृहा जोशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कविताचे कार्यक्रम आणि तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटमध्ये व्यग्र आहे. स्पृहा याआधी काही बॉलिवूड चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये दिसली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT