Sonali kulkarni  Saam tv
मनोरंजन बातम्या

Sonali kulkarni : 'मला माझ्या नावाचा सर्वाधिक त्रास होतो...'; सोनाली कुलकर्णी असं का म्हणाली?

Sonali kulkarni interview : 'मला माझ्या नावाचा सर्वाधिक त्रास होतो..., असं म्हणत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नावाविषयी खंत बोलून दाखवली.

Rutuja Kadam

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिंदी तसेच मराठी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी सिनेमा आणि नाटकांमधून तिने लोकांच्या मनात घर निर्माण केले आहे. सोनाली आणखी एका कारणाने लोकांना भावते. ते म्हणजे तिचा स्पष्टवक्तेपणा! अभिनय क्षेत्रातील, समाजातील विविध विषयांवर ती कायमच स्पष्टपणे बोलते. तिचे मत अतिशय परखडपणे मांडते. तिने एका युट्युब चॅनलला नुकतीच मुलाखत दिली. आजवरचा तिचा प्रवास, लग्न, संसार आणि इतर अनुभवांविषयी ती मोकळेपणाने बोलली आहे.

सोनालीने मुलाखतीदरम्यान तिच्या नावाविषयी महत्त्वाचे भाष्य केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दोन सोनाली आहेत. एवढचं नाहीतर दोघींचं आडनावसुद्धा सारखेच आहे. नावसाधर्म्य असल्यामुळे साहजिकच या क्षेत्रात वावरताना अनेकांचे गैरसमज होतात. नेमकी कोणती सोनाली? हा प्रश्न सर्रासपणे विचारला जातो. याविषयावर सोनाली गंभीरपणे बोलली. आपली खंत तिने उघडपणे बोलून दाखवली.

सोनाली कुलकर्णी हे नाम साधर्म्य असल्याने नेमके काय अनुभव आले आहेत? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आला. यावर सोनाली भरभरुन बोलली आहे. ''मला माझ्या नावाचा खूप त्रास होतो. इतके वर्ष काम करुनही मला सतत सांगावं लागतं की, मी कुठली सोनाली कुलकर्णी आहे. अनेक कार्यक्रमांचे मला चुकीचे फोन येतात. दुसऱ्या सोनालीला मी अनेकदा यासंदर्भात फोन केला होता." अशी खंत तिने व्यक्त केली. दरम्यान, याविषयी बोलताना तिने बॉलिवूडच्या कियारा अडवाणीचा संदर्भ दिला.

कियाराचे खरे नाव आलिया अडवाणी असे आहे. सलमान खानच्या सल्ल्यानंतर तिने आपले नाव बदलून कियारा केले. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना तिने नावात बदल केला. त्याचे मुख्य कारण म्हणजे, बॉलिवूडमध्ये आधीच आलिया भट्ट ही अभिनेत्री होती. हेच उदाहरण सोनाली कुलकर्णीने दिले आहे. ज्या पद्धतीने कियाराने प्रयत्न केला तसा इथेही व्हायला हवा होता, असे मत तिने मांडले आहे.

दोन्ही सोनालींचा इगो कधी क्लॅश होतो का? असा प्रश्नही मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता. यावरही उघडपणे आणि परखडणे सोनालीने उत्तर दिले. '' कियाराने तिच्या आणि तिच्यासारखे नाव असणाऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाची काळजी घेण्यासाठी प्रयत्न केला. माझ्या नावाची थोडी काळजी घेतली असती तर बरे वाटले असते. गुगलवर सर्च केल्यावर आजही सोनाली कुलकर्णी शोधल्यावर वेगळे फोटो येतात. मी इतकेही नगण्य काम केलेले नाही. या सर्व गोष्टी त्रासदायक आहेत. हे टाळता आले असते. त्यामुळे मी काहीच भरीव काम केलेले नाही, असे मला वाटते.'', असं सोनालीने म्हटले आहे.

सोनाली तितकेच कसदार लेखनसुद्धा करते. तिच्या लेखनाचा वेगळा आणि मोठा वाचनवर्ग आहे. बिनधास्त आणि बेधडकपणे विविध विषयांवर ती कायम बोलत आली आहे. नाटक, सिनेमे यातून तिने आपली वेगळी जागा निर्माण केली आहेच. पण, 'सो कुल' आणि 'सो कुल टेक २' ही तिची पुस्तकेसुद्धा प्रसिद्ध झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

SCROLL FOR NEXT