Maylek Movie Poster Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maylek Movie: 'मायलेक' १९ एप्रिलला येतोय भेटीला, आई-मुलीचं सुंदर नातं रूपेरी पडद्यावर उलगडणार; पोस्टर आऊट

Maylek Movie Poster Out: आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या 'मायलेक' चित्रपटाचे नुकताच नवीन पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.

Priya More

Sonali Khare Maylek Movie:

२०२३ प्रमाणे २०२४ हे वर्ष देखील मराठी सिनेरसिकांसाठी खूप खास ठरणार आहे. या वर्षामध्ये देखील मराठी सिनेरसिकांसाठी मनोरंजनाची खास मेजवणी असणार आहे. या वर्षामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले, अनेक चित्रपटांची घोषणा झाली, तर काही चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशामध्ये आता आणखी एक चांगला कंटेट असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मायलेक' (Maylek Movie) असं या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. १९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या 'मायलेक' चित्रपटाचे नुकताच नवीन पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. येत्या १९ एप्रिलला माय-लेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रियांका तन्वर या दिग्दर्शिका आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मायलेक चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने, महेश पटवर्धन, वंश अग्रवाल हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रिअलमधील माय-लेक रीलमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. हा चित्रपट प्रत्येक मुलगी आणि आईला जवळचा वाटेल. सोनाली खरेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

आई आणि मुलीचे नाते हे नेहमीच खास असते. कधी त्या मैत्रिणी असता. तर कधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात. कधी मुलगी आई बनून आईला साथ देते. तर कधी आई मुलीच्या मागे खंबीरपणे उभी राहते. या नात्यातील अशीच अनोखी गंमत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता यांचे नाते कसे असणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Recipe : बेकरीसारखा मऊ-लुसलुशीत पाव घरी कसा बनवावा? 'ही' आहे एकदम सोपी रेसिपी

Mrunal Thakur Movie : "क्योंकि हर इश्क परफेक्ट नहीं होता..."; सिद्धांत-मृणाल पहिल्यांदाच एकत्र, 'दो दीवाने सहर में'चा रोमँटिक टीझर पाहिलात का?

Bats hang upside down: झाडावर नेहमी उलटं का लटकलेलं असतं वटवाघुळ?

Maharashtra Live News Update: बाळा भेगडेंना भाजपमध्ये कोण विचारतं? - शेळके

Nagpur : नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, शहरातील वाहतुकीत मोठा बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा

SCROLL FOR NEXT