Asatana Tu Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Asatana Tu Song: आई आणि मुलीमधील सुंदर नाते उलगडणार, 'मायलेक'मधील 'असताना तू' गाणं रिलीज

Sonali Khare Maylek Movie: 'मायलेक' या चित्रपटाच्या पोस्टर, टीझरनंतर आता पहिले गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटातील 'असताना तू' हे गाणं नुकताच प्रदर्शित झाले असून या गाण्याच्या माध्यमातून मायलेकीची मैत्री उलगडणार आहे.

Priya More

Maylek Movie:

आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या 'मायलेक' चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली खरे आणि तिची मुलगी सनाया आनंद मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून रिअल लाइफ आई-मुलगी आपल्याला एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टर, टीझरनंतर आता पहिले गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटातील 'असताना तू' हे गाणं नुकताच प्रदर्शित झाले असून या गाण्याच्या माध्यमातून मायलेकीची मैत्री उलगडणार आहे.

ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित 'मायलेक' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यामागचे कारण म्हणजे या चित्रपटात झळकणाऱ्या खऱ्या मायलेकी. टीजरमधून आपल्याला त्यांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळाली. आता टीजरनंतर या चित्रपटातील पहिले जबरदस्त गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातून आता प्रेक्षकांना मायलेकींची मैत्री पाहायला मिळणार आहे. 'असताना तू' असे या गाण्याचे बोल आहेत. हे सुरेख आणि हॅपनिंग गाणं पंकज पडघन यांनी गायले आहे. या गाण्याला सावनी भट यांची साथ लाभली आहे. पंकज पडघन यांनीच या गाण्याला अफलातून संगीत दिले आहे. तर क्षितिज पटवर्धन यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे.

या गाण्यातून आई आणि मुलीच्या नात्यातील बॅाण्डिंग पाहायला दिसत आहे. प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत आपण एकमेकांसोबत आहोत, असा या गाण्याचा सार आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. हा चित्रपट प्रत्येक मुलगी आणि आईला जवळचा वाटेल.'मायलेक' या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. 'मायलेक' हा चित्रपट येत्या १९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

सोनाली खरेने या गाण्याबद्दल सांगितले की, 'मी आणि मायरावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे आम्हा दोघींना अगदी तंतोतंत जुळते. आमचे प्रत्यक्षात असेच गोड नाते आहे. कदाचित त्यामुळेच आमच्यातील ही केमिस्ट्री पडद्यावर नैसर्गिक दिसत असावी. गाणे रॉकिंग असल्याने रेकॉर्डिंगलाही प्रचंड धमाल आली. मुळात गाण्याची टीम अतिशय हॅपनिंग आहे. आई आणि मुलीमधील सुंदर नाते उलगडणारे हे गाणं आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT