Mylek Trailer Instagram
मनोरंजन बातम्या

Mylek Trailer: सोनाली खरेच्या 'मायलेक'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार

Mylek Trailer Out: नावावरूनच हा चित्रपट आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर आधारित आहे. रिअल लाइफ मायलेकीची अनोखी कथा आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. पोस्टर, टीझर आणि गाण्यानंतर नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला.

Priya More

Mylek Movie:

मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) लवकरच 'मायलेक' चित्रपटाच्या (Mylekh) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सोनाली खरे आणि रिअल लाइफ मुलगी आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. नावावरूनच हा चित्रपट आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर आधारित आहे. रिअल लाइफ मायलेकीची अनोखी कथा आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. पोस्टर, टीझर आणि गाण्यानंतर नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मायलेक चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, हर्षदा खानविलकर, संजय जाधव यांनी हजेरी लावली होती. मायलेकच्या ट्रेलरमध्ये आई-मुलीचे स्ट्राँग बाँडिंग दिसत असतानाच त्यांच्या या सुंदर नात्यात दुरावा येत असल्याचेही पाहायला मिळत आहे. आता हा दुरावा का येतोय, यात उमेशची भूमिका काय? या मायलेक पुन्हा एकत्र येणार का? तुम्हाला पडलेल्या अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर मिळणार आहे.

ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाची सोनाली आनंद निर्माती आहे. या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद सहनिर्मिती या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. आई आणि मुलीची सुंदर केमिस्ट्री मायलेकमधून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

सोनाली खरेने चित्रपटाबद्दल सांगितले की, 'हा चित्रपट प्रत्येक आई-मुलीची गोष्ट सांगणारा आहे. खूप संवेदनशील असे हे नाते आहे. हे नाते कधी मैत्रीचे असते तर कधी एका वेगळ्याच वळणावर जाते. त्यामुळे हे नाजूक नाते उत्तमरित्या, विचारपूर्वक हाताळणे खूप गरजेचे आहे. 'मायलेक'मधून कोणताही संदेश देण्यात आलेला नसून तुमच्या आमच्या घरातील 'मायलेकी'ची ही जोडी आहे. ज्या धमाल, मजामस्ती करत आहेत. वाईट काळात मोठे निर्णय घेताना एकमेकींना साथही देत आहेत. त्यामुळे मायलेक तुम्हाला विशेषतः आईमुलीला खूप जवळचा वाटेल. माझे आणि सनायाचे नातेही असेच आंबटगोड आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mahakumbh Monalisa: करोडोंचे हिरे, आलिशान गाडी, महागडे कपडे महाकुंभाच्या मोनालिसाचा स्टेटस बघून व्हाल थक्क

Marathi Serial: अभिनेत्री समृद्धी केळकर दिसणार या मराठी मालिकेत

Badnapur News : नागरी सुविधा नसल्याने ग्रामस्थ संतप्त; सरपंचासह ग्रामसेवकाला कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

SCROLL FOR NEXT