मनोरंजन बातम्या

Sonalee Kulkarni ने 'मलाइकोट्टाई वालिबान'च्या सेटवरील BTS VIDEO केला शेअर, कसं झालं शूटिंग?

Sonalee Kulkarni BTS Video: 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटामध्ये (Malaikottai Vaaliban Movie) सोनालीने महत्वाची भूमिका साकारली असून तिने या चित्रपटात आपले नृत्यकौशल्य देखील दाखवले.

Priya More

Malaikottai Vaaliban Movie:

मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' अर्थात सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटाद्वारे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली. मराठी, हिंदी चित्रपटांनंतर आता साऊथ चित्रपटांमध्ये सोनाली कुलकर्णीने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटामध्ये (Malaikottai Vaaliban Movie) सोनालीने महत्वाची भूमिका साकारली असून तिने या चित्रपटात आपले नृत्यकौशल्य देखील दाखवले. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. अशामध्ये सोनाली कुलकर्णीने नुकताच या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सोनाली कुलकर्णीने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सोनाली कुलकर्णीसोबत या चित्रपटाची संपूर्ण टीम शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सोनाली कुलकर्णी एका टेबलवर बसली आहे. तिने डार्क पर्पल कलरची नववारी साडी नेसली आहे. मोकळे केस सोडलेल्या सोनालीने सुंदर मेकअप केला असून तिने नाकामध्ये नथ घातली आहे. तर पायामध्ये कोल्हापूरी चप्पल घातली आहे. तिच्या चेहऱ्यावर हळद लावली आहे.

सोनाली कुलकर्णीने या बीटीएस व्हिडीओद्वारे हो शूटिंग कसे करण्यात आले आणि टीमने कॅमेरा वर्क कसे केले हे सांगितले आहे. कलाकाराच्या भूमिकेतील अचूक हावभाव टिपण्यासाठी बॉडी रिंग कॅमेराचा वापर करण्यात आला. मधुनीलकंदनच्या सुंदर कॅमेरा वर्कसाठी हा चित्रपट नक्की पाहा. ' सोनाली कुलकर्णीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती दिली आहे. त्यांनी या चित्रपटातील तिच्या कामाचे खूपच कौतुक केले आहे.

या चित्रपटामध्ये सोनालीने साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. सोनाली कुलकर्णीचा पहिलाच मल्याळम चित्रपट 'मलाइकोट्टाई वालिबान' २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट २५ जानेवारीला तामिळ, तेलुगू, कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट या आठवड्यामध्ये हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून कॅनडामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT