मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) 'कासरा' चित्रपटाच्या (Kasara Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. स्मिता तांबेचा हा चित्रपट शेतीप्रधान असणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील 'घराला घरपण' (Gharala Gharpan Song) हे गाणं प्रदर्शित झाले आहे. गायिका सोनाली सोनावणेने आपल्या सुमधुर आवाजामध्ये हे गाणं गायलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं धुमाकूळ घालत असून त्याला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
बळीराजाच्या संघर्षाची गोष्ट सांगणाऱ्या 'कासरा' चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या एक-एक अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत होते. अशामध्ये आता या चित्रपटातील 'घराला घरपण' हे गाणं लाँच करण्यात आले आहे. शेतकरी कुटुंबातल्या संतुष्ट आयुष्याचं चित्रण या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
'घराला घरपण' हे गाणं सोनाली सोनावणे आणि रवींद्र खोमणे यांनी गायलं आहे. समाधानी, संतुष्ट असलेल्या शेतकरी कुटुंबाचं चित्रण या गाण्यात पाहायला मिळतं. अतिशय अर्थपूर्ण शब्द, श्रवणीय संगीत, गायकांचा भावपूर्ण आवाज आणि उत्तम चित्रीकरण यांचा मिलाफ या गाण्यात झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घराचं प्रतिबिंब पाहिल्याची भावना या गाण्यातून मिळणार आहे.
रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्स या निर्मिती संस्थेनं कासरा चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रवी नागपूरे यांच्याच कथेवर महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन, प्रशांत नाकती, संकेत गुरव यांनी संगीत दिग्दर्शन, प्रशांत नाकती यांनी गीतलेखन केले आहे.
कासरा चित्रपटामध्ये स्मिता तांबे, गणेश यादव, जनमेजय तेलंग, तन्वी सावंत, राम पवार, प्रकाश धोत्रे, डॉ. वंदना पटेल, कुणाल सुमन, साई नागपूरे, देवेंद्र लुटे, विशाल अर्जून हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. शेतकरी कुटुंबाची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आल्याने या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टीत चांगलीच चर्चा रंगली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.